बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता (Weather forecast) हवामान विभागाने वर्तवली आहे. एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
तर ४ सप्टेंबर रोजी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.५ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगरह मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची आहे. त्यासाठी या भागात यलो अलर्ट जारी केला आहे.
४ सप्टेंबर पासून परत राज्यात पावसाचे पुनरागमन
बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४-६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता pic.twitter.com/k0MKLkvFkh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2021
रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट कधी दिला जातो?
पावसाची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. लक्ष असावे असा याचा अर्थ आहे. तर पावसाची तीव्रता वाढल्यानंतर इशारा स्वरुपात रेड अलर्ट जारी करण्यात येते. कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असल्यास सतर्क राहण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. कोणत्याही धोक्याची सूचना नसल्यास ग्रीन अलर्ट दिला जातो.