वरुर जऊळका – समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्ये औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान (गजानन महाराज संस्थान) येथे चार सप्टेंबर अकरा सप्टेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाला गजानन विजय ग्रंथाचे पारायणाची जोड देण्यात आली असुन पारायण प्रवक्ते ह भ प श्री रामदास महाराज जंजाळ व ह भ प श्री वैभव महाराज वसु आहेत कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 5 ते 6 काकडा आरती सकाळी १० ते १२ गजानन विजय ग्रंथाचे पारायण दु ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत हरी कीर्तन राहील सप्ताहामध्ये चार सप्टेंबर भानुदास महाराज टाकळीकर टाकळी ,पाच सप्टेंबर रामकृष्ण महाराज आंबुस्कर अकोला ,सहा सप्टेंबर श्रीकृष्ण महाराज सावळे गुरुजी अकोला , सात सप्टेंबर रामेश्वर महाराज दुदे यवतमाळ, आठ सप्टेंबर शालिग्राम महाराज सुरळकर बुलढाणा,नऊ सप्टेंबर नारायण महाराज पडोळे, दहा सप्टेंबर बाल कीर्तनकार सोहम महाराज काकडे चिखली मेहकर यांचे कीर्तन राहील व अकरा सप्टेंबरला ऋषी पंचमी निमित्त गणेश महाराज शेटे यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसाद होईल दरवर्षीप्रमाणे महाप्रसादा नंतर दुपारी चार वाजता वरुर जऊळका संतनगरी मधून श्रींच्या पादुका व मुखवट्या सह ग्रंथ दिंडी सोहळा पार पडेल आणि रात्री संतोष महाराज भालेराव यांच्या भारुळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहातील सर्व कार्यक्रम कोरोणा चे नियम व अटी पांडून पार पडतील अशी माहिती योग योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आली तरी पंचक्रोशीतील सर्व गायक , वादक व उपस्थित राहणार असून भाविक मंडळी ने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे