कर्जत: कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय १५) व विरेंद्र रामा हाके (वय १६) अशी नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
कर्जत तालुक्यातील ताजू गावाजवळ असणाऱ्या लोखार येथील मावळे वस्तीवरील हरीआणि विरेंद्र हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात गेले होते.
याचदरम्यान हरी व विरेंद्र त्यांच्याकडील शेळ्या चरत- चरत थेट शेळगाव शिवारातील भवानी माता मंदिराच्या पुढे आल्या. याठिकाणी चोपडा यांचे शेततळे आहे. या शेततळ्यामध्ये दुपारी एकच्या मारास हरी व विरेंद्र उतरले. त्यांना शेततळ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शेळ्या घरी परतल्यावर समजली घटना
या परिसरात कोणीच नसल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, सवयीप्रमाणे शेळ्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी परतल्या मात्र. मुले आली नाहीत म्हणून घरच्यांनी आजुबाजूच्या परिसरात मुलांना शोधकार्य सुरू केले.
याच दरम्यान हरी व विरेंद्रचे कपडे आणि चपला भवानी माता मंदिरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ सापडल्या.
यानंतर यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर हरी व विरेंद्र पाण्यात बुडाल्याचे कुटुंबीयांना समजले.
पेडगाव येथील दोन तरुण आसिफ शेख व समीर शेख यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.