तेल्हारा(शुभम सोनट्टके)- शहरात डेंग्यू, हिवताप आणि टायफॉईड चे रुग्ण जवळपास 1 महिन्या पासून वाढत आहेत. पण नगर परिषद ने अजून पण कोणत्याही प्रकारची फवारणी किंवा इतर उपाययोजना केलेल्या नाहीत म्हणून वंचित बहुजन आघाडी तेल्हारा शहराच्या वतीने नगर परिषद तेल्हारा ला बेशरम चे तोरण बांधले.
25 हजार लोकसंख्या असणाऱ्या शहरात 1 धुवारणी मशीन ने फक्त 2 दिवस झाले फोगिंग मशीन द्वारे धुवारणी चालू आहे. नगर परिषद चे स्वतः च्या 16 मशीन नादुरुस्त पडलेल्या आहेत.
कोट्यवधी ची उलाढाल असणाऱ्या नगर परिषद जवळ ह्या अश्या महामरीत पण लोकांच्या आरोग्यासाठी पैसे नाहीत की इच्छाशक्ती नाही असा प्रश्न उदभवत आहे.
8 दिवसाच्या आत संपूर्ण शहरातील फवारणी करावी, तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न पण सोडवावा अन्यथा तीच डेंग्यू चे मच्छर मुख्याधिकरी ह्यांच्या कक्षात सोडू असे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी ह्यांना सांगितले.
आंदोलन वेळी अशोक दारोकर ता महासचिव, विकास पवार शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गोवर्धन पोहरकार न प सदस्य वंचित, प्रमोद चव्हाण, सतीश मामनकार, संघर्ष बोदडे, नितीन पोहरकार, अजय पोहरकार, आकाश पोहरकार, अनिल तायडे, मुजाहिद कुरेशी, मनोज पोहरकार, मिलिंद हिवरळे, अक्षय दामोदर, आकाश जसनपुरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.