आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’ भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. यंदा 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आली आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तिंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खास कोट्स पाठवून तुम्ही आजचा दिवस भगवान श्रीकृष्णाचे विचार शेअर करु शकता. या विचारांनी तुमचे आयुष्य बदलण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. जाणून घेऊया जन्माष्टमीच्या निमित्ताने हे खास कोट्स .
- रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे - सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता कोणीकडे.. (दासबोध)
अर्थ: सकाम भक्ती केली तर कामना पूर्ण होईल. - वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे)
जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे - अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
अन्यायाचा कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
गोकुळात श्रीकृष्ण जन्माचा आनंद हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडेही श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी ही मोठ्या आनंदात साजरी केली जाते या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश .
- गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! - दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा! - राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा! - कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा! - चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
मेसेज मधून शुभेच्छा देण्याची एक मजाच वेगळी असते. तुम्हालाही तुमच्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना कृष्ण जन्माष्टमीचे मेसेज
- हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
- दिन आला मोठा आज कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
- कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार… कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
- कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा - वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!