• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांना मोठा धक्का; ५ कोटींची मालमत्ता जप्त

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
165 2
0
एकनाथ खडसे यांना मोठा धक्का;
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आणखी एक धक्का बसला आहे. पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैर व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील तब्बल 5 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे 3.1 एकर प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. यात 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना म्हणजे रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी बैठक बोलावली.

जमीन उकानींना परत द्यावी की, त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा केला जातो. पुढे उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

दरम्यान, ईडीने याप्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने एकनाथ खडसे यांची याप्रकरणी चौकशी केली असून त्यांच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती.

तसेच, खडसेंच्‍या कन्या अध्यक्षा असलेल्‍या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावून संत मुक्ताई साखर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे मागविली आहेत.

Tags: EDMIDCMumbai
Previous Post

लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते Good News; पुन्हा होणार पगारात वाढ?

Next Post

नारायण राणे : ‘आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?’

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
'आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?'

नारायण राणे : 'आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?'

आमदार बच्चू कडू

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.