तेल्हारा (शुभम सोंनट्टके )- नगर परिषद तेल्हारा ची आगामी निवडणूक होऊ घातली असता त्या करिता शहराची निवडणूक मतदार यादी १५ जानेवारी २०२१ ची गृहीत न धरता येती. निवडणूक डिसेंबर किवा नंतर झाली असता १५ जानेवारी २०२१
च्या नंतर चि नवीन मतदार यादीचा प्रोग्राम जाहीर करून त्या अहवाल तथा माहीतीच्या आधारे नवीन मतदार
यादीत प्रसिद्ध करून तीच निवडणुकी करिता गृहीत धरावी.
नवीन मतदार यादी करिता प्रोग्राम जाहीर करावा हि विनंती सदर निवेदनात केली. हे सदर निवेदनावर मितेश रामकिसन मल्ल, गोवर्धन तनसुख पोहरकर, मंगेश श्रावण सोळंके, सौ. अरुणा मंगेश ठाकरे, सौ. दिपाली निलेश धनभर, सौ. सुनिता शेखर भूजबले व स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद तेल्हारा, सदस्य गण यांनी तहसीलदार तेल्हारा यांच्याकडे मागणी केली आहे.