नारायण राणे यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन: शिवसेनेशी पंगा घेतलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवर चर्चा केली. शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर केंद्रीय पातळीवरील एकाही नेत्याने अजून राणे यांच्याशी चर्चा केली नव्हती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे.
शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी शहा यांच्या फोनबाबत माहिती दिली आहे.
शहा यांनी राणेंची विचारपूस केली व त्यांच्याकडून राज्यातील दोन दिवसांतील घडामोडींची माहिती घेतली, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर राणे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हा दाखल होताच नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले. तत्पुर्वी रायगड पोलिसांनी त्यांना संगमेश्वर येथून ताब्यात घेतले.
सोमवारी दिवसभर युवा सेना, शिवसेनेने राज्यभर उग्र आंदोलन करून भाजपविरोधात आघाडी उघडली.
राणे यांना अटक झाल्यानंतर राज्यात शिवसेनेने फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता.
गेल्या काही दिवसांतील घडामाोडींचा आढावा अमित शहा यांनी नारायण राणे यांच्याशी फोनवरून घेतला.
त्पुर्वी ‘आपण नॉर्मल माणूस वाटलो काय?’ असे म्हणत त्यांनी सेनेला आव्हान दिले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई झालीच.
या संपूर्ण घडामोडींमुळं शिवसेनेने राणे आणि भाजपला राजकीय दणका दिल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लावण्यात आलेल्या चौकशीच्या ससेमिऱ्याला हे ससणीत उत्तर असल्याचे बोलले जात आहे.
हा तर संदेश
केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत राज्यातील नेत्यांना त्रास झाल्यास, राज्य सरकारही शांत राहणार नाही, असा संदेश या माध्यमातून दिला आहे.
राणे यांच्या आक्रमक स्वभावाचा फायदा होणार की तोटा याचे गणित अद्याप मांडले जात नसले तरी केंद्रीय पातळीवरील नेतेही सक्रिय झाले आहेत.
अमित शहा यांनी राणे यांच्याशी फोनवरून काय चर्चा केली याचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. मात्र, राणे यांना अटक आणि त्यानंतरच्या घडामोडी याबाबत त्यांनी माहिती घेतल्याचे समजते