• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 17, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

काबूल विमानतळ : पानी ३ हजार रुपये लीटर, साडेसात हजार रुपयांना राईस प्‍लेट

Our Media by Our Media
August 26, 2021
in आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
182 2
0
काबूल विमानतळ : पानी ३ हजार रुपये लीटर,
35
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

काबूल: सत्ता काबीज केल्‍यानंतर तालिबान्‍यांनी अफगाणिस्‍तानमधील जनतेला वेठीस धरले आहे. काबूलमध्‍ये निर्दयी कृत्‍य करत तालिबान्‍यांचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच काबूल विमानतळ परिसरामध्‍ये अत्‍यंत बिकट परिस्‍थिती आहे. अफगाणिस्‍तान सोडण्‍यासाठी काबूल विमानतळ परिसरात जमलेल्‍या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी आणि अन्‍नासाठी ते तळमळ आहेत. याचाच फायदा घेत या नागरिकांची लूट सुरु आहे.

तालिबान्‍यांनी अफगाणावर कब्‍जा केल्‍यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडण्‍यासाठी विमानतळाकडे धाव घेतली. त्‍यामुळे या परिसरात एकच गोंधळ माजला आहे. तालिबान्‍यांनीही काबूलमध्‍ये क्रूरतेचे नवे चित्र रोज समोर येत आहे. भविष्‍यात होणार्‍या भयावह छळाच्‍या भीतीने देशातील जनता घरासह सर्व सामान सोडून देश साेडण्‍यासाठी विमानतळावर गर्दी करीत आहेत.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

विमानतळावर अत्‍यंत विदारक परिस्‍थिती

एका रिर्पाटनुसार, काबूल विमानतळावरील परिस्‍थिती अत्‍यंत विदारक आहे. येथे सर्वसामान्‍य नागरिकांना पाणी व अन्‍नासाठी तळमळत आहेत. शेकडो नागरिकांची उपासमार सुरु आहे. काबूल विमानतळावर एक पानाची बाटली तीन हजार रुपयांना (४० डॉलर) तर राईस प्‍लेटसाठी तब्‍बल साडेसात हजार रुपये (100 डॉलर) मोजावे लागत आहेत.

अफगाणचे चलन तालिबान्‍यांनी नाकारले

विमानतळावर कोणतीही वस्‍तु खरेदी करायची असेल तर अफगाणिस्‍तानचे अधिकृत चलनही तालिबानी घेत नाहीत. केवळ डॉलर असणार्‍यांनाच खरेदी करता येत आहे. यामुळे केवळ अफगाणिस्‍तानचे चलन असणार्‍या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. देश सोडून जाता येत नाही आणि कोणतीही वस्‍तू खरेदी करता येत नाही, अशा भीषण संकटात ते सापडले आहे. डॉलर असणार्‍यांकडूनही तालिबान्‍यांची लूट सुरु आहे.

लहान मुलांचे अताेनात हाल

अफगाणिस्‍तानमध्‍ये अडकलेल्‍या विदेशी नागरिकांबरोबर स्‍थानिक नागरिक विमानतळाबाहेरील रांगेमध्‍ये उपाशी उभे आहेत. यामध्‍ये सर्वाधिक हाल हे लहान मुलांचे होत आहेत. उपासमारीमुळे काही मुले बेशुद्‍ध पडत आहेत. आता नागरिक हतबल झाले आहेत. काबूल विमानतळाबाहेर तब्‍बल ५० हजारांहून अधिक नागरिकांची गर्दी आहे. प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. या गर्दीमुळे विमानतळावर पोहचणेही अशक्‍य झाले असल्‍याचे या रिर्पाटमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

विमानतळाबाहेरील परिस्‍थिती चिंताजनक

विमानतळाच्‍या धावपट्‍टीवर मोठ्या संख्‍येने नागरिक जमले आहेत. विमानतळा बाहेरील परिस्‍थिती अत्‍यंत चिंताजनक आहे. देश सोडण्‍याची परवानगी मिळालेले नागरिकांनाच विमानतळवर जाण्‍याची परवानगी आहे. तर विमानतळा बाहेरील नागरिकांनी चिंतेने ग्रासले आहे. प्रचंड गर्दीमध्‍ये आता कोरोनाचेही नाही तर तालिबान्‍यांची दहशत आहे, असेही या रिर्पाटमध्‍ये म्‍हटले आहे.

Tags: AfganistanKabul Airporttaliban
Previous Post

राज्यातील अकोल्यासह अठरा महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभात पद्धतीने होणार

Next Post

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू
Featured

T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू

May 29, 2024
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

May 16, 2024
Covishield-vaccine
Featured

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

May 8, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान
Featured

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

March 12, 2024
Next Post
रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत;

रकुल प्रीत, भल्लाळदेव ड्रग्ज प्रकरणात अडचणीत; ईडीने बजावली नोटीस

अकोला डाबकी पोलिसांना चोरट्यांचे आवाहन

ओझर येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून लुटले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.