तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा तालुक्यातील ईसापुर येथिल वृध्द विधवा महीला सुशीलाबाई महादेव कचवे या महीलेचे घर पावसामुळे कोसळल्यामुळे बेघर झालेल्या महीलेला सरपंच मिराताई आनंद बोदडे यांचे प्रयत्नाने तहसिलदार डाॕ.
संतोष येवलीकर यांचे आदेशावरुन तलाठी गणेश डोंगरे यांणी पंचनामा करुन सदर महीलेला ५००० रु नगदी अनुदान देण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरीक एकनाथराव रेलकर, माजी उपसरपंच ज्ञानदेवराव बोदडे वासुदेवराव मोरे, रामचंद्र नागे, वासुदेवराव घाटोळ, उदेभान घाटोळ, पञकार आनंद बोदडे, खंडुजी घाटोळ, अनंता शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रशांत शिंदे, शिपाई संघपाल ससाने सोनु मोडोकार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसिलदार डाॕ. सतोष येवलीकर व तलाठी डोंगरे यांणी योग्य ती कारवाई करुन शासनाकडुन मिळणारे अनुदानाचा तात्काळ लाभ दिल्याबद्दल वृध्द महीलेसह उपस्थित ग्रामस्थांनी त्त्यांचे कौतुक केले.सर्वप्रथम अवर अकोला न्यूजने याबाबत तालुका प्रशासनाला हि बाब लक्षात आणून दिली होती हे विशेष….