नवी दिल्ली: LG 6G Test भारतात 5G अजून लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, पण दक्षिण कोरियन टेक कंपनी एलजी (LG)ने 6G ची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे. एलजीने जर्मनीमध्ये 6G ची चाचणी केली आहे, ती यशस्वीही झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
चाचणीसाठी कंपनीने टेराहर्ट्झ स्पेक्ट्रमचा वापर केला. कंपनीने हे काम एकट्याने केले नाही. परंतु एलजीने युरोपियन रिसर्च फर्म ‘फ्रॉनहोफर-गेसेलशाफ्ट’च्या (Fraunhofer-Gesellschaft) भागीदारीत 6G ची चाचणी केली आहे.
13 ऑगस्ट रोजी जर्मनीच्या बर्लिनमध्ये ही यशस्वी चाचणी झाल्याची माहिती LG ने दिली आहे. यामध्ये कंपनीने बाह्य वातावरणात 100 मीटर अंतरावरील डेटा यशस्वीरित्या हस्तांतरित केला.
‘फ्रॉनहोफर-गेसेलशाफ्ट’च्या सहकार्याने कंपनीने एक विशेष पॉवर एम्पलीफायर विकसित केले आहे जे टेराहर्ट्झ स्पेक्ट्रमवर स्थिर 6G सिग्नल वितरीत करण्यात मदत करते. हे एम्पलीफायर 155-175 गीगाहर्ट्ज (GHz) बँडमध्ये स्थिर संवाद साधण्यासाठी 15-डेसिबल मिलिवॅटचा जास्तीत जास्त आउटपुट सिग्नल देऊ शकते.
एवढेच नाही तर, एलजी अॅडॅप्टिव बीमफॉर्मिंग टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करण्यातही यशस्वी झाली आहे. हे चॅनेल आणि रिसीव्हरच्या स्थितीनुसार बदलते तसेच सिग्नलची दिशा बदलते तसेच हाय गेन अँटेना स्विचिंग करते. हे एकाधिक पॉवर एम्पलीफायर्सचे आउटपुट सिग्नल एकत्र करून त्यांना एका निश्चित अँटेनामध्ये प्रसारित करू शकते.
कंपनीचे म्हणणे आहे की, 2025 साठी जागतिक मानकीकरण आणि त्यानंतर चार वर्षांच्या आत व्यापारीकरण, 6G नेटवर्क जलद वायरलेस ट्रांसमिशन आणि कमी विलंब सह संप्रेषण गतीला समर्थन देण्यास सक्षम असतील.
कंपनी पुढे सांगते की, 6G हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे जे लोकांची उपस्थिती आणि आवडीनिवडी ओळखून त्यांच्या गरजेनुसार अधिक संवेदनशील, अनुकूल, स्वायत्त आणि वैयक्तिक बनवून राहणीमान आणि व्यावसायिक वातावरण सुधारण्याचे उद्दीष्ट ठेवते.