अकोला: जिल्ह्यात अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात युवक तापीने फनफनतोय हि गंभीर बाब असून आरोग्य विभागाने लक्ष देन्याची गरज आहे.
अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवक वर्गाला तापाची लागण लागली असून गावागावात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवकांचे अधिक प्रमाण असून जिल्हयातील डॉक्टरांकडे तपासणीकरिता जात असून १५ ते ३० दिवसांचा कालावधी बरा होण्यासाठी सदर रुग्णांना लागत आहे.
काहींना दोन तीन दिवसात बरे वाटते मात्र पुन्हा ताप येऊ लागल्याने एकप्रकारे भीतीचे वातावरण संपूर्ण जिल्हयात बघायला मिळत आहे त्यामुळे आरोग्य विभागाने याबाबत ठोस पावले उचलून युवक वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात का फनफनतोय या बाबत योग्य उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.