अमरावती : अमरावती शहर पोलिस दलात पदोन्नतीच्या मार्गावर असलेल्या पोलिस उप निरीक्षक अनिल मुळे यांनी गेल्या 13 ऑगस्ट रोजी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपुष्टात आणली होती.
या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांकडून विविध आरोपात्मक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी देखील करण्यात आली होती.
या आत्महत्येचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक सीआयडीला देण्यात आला आहे. अनिल मुळे हे कधी कधी व किती वाजता पोलिस आयुक्तालयात वरिष्ठांच्या भेटीला आले होते.
त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज यासह विविध पुरावे संकलीत करण्याचे काम सीआयडीने सुरु केले आहे.