• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली

Our Media by Our Media
August 21, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
324 3
0
विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी
74
SHARES
2.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

Dehradun Marriage: विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती.

देहराडून – उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. सितारगंजमधील एका तरुणीचा विवाह एका वयस्कर व्यक्तीशी करण्यात आला होता. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. वयस्कर नवऱ्याऐवजी एका तरुणाचा फोटो दाखवून तिला लग्नासाठी राजी करण्यात आले होते. मात्र विवाह करून ही तरुणी जेव्हा सासरी गेली. तेव्हा नवऱ्याचा चेहरा पाहून तिला धक्का बसला. तिचे लग्न लावून दिलेला नवरा वयस्कर निघाला. तो आधीपासूनच विवाहित होता. एवढेच नाही तर घरात त्याची पत्नी आणि मुलेही होती. दरम्यान, हा प्रकार पाहून ही नवरी तिथून पळाली. तिने सासरी जाण्यास नकार दिला. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांसमोरही तरुणीने सासरी जाण्यास नकार दिला. (After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated)

मिळालेल्या माहितीनुसार आता सदर तरुणीने वयस्कर पतीचे घर सोडून प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच तिने याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गंगाराम गोला यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल. शहरातील एक क्रमांकाच्या वॉर्डमधील तरुणी शेजारील तरुणासह पोलीस ठाण्यात पोहोचली. तरुणीने सांगितले की, तिचा विवाह बरेली जिल्ह्यातील सेंथल गावातील एका वयस्कर पुरुषासोबत लावून देण्यात आला. लग्नाला तयार करण्यासाठी तिला एका तरुणाचा फोटो दाखवण्यात आला. तो पाहून तिने लग्नाला होकार दिला. मात्र प्रत्यक्षात तिचा विवाह एका तीन मुलांच्या पित्यासोबत लावून देण्यात आला.

विवाहानंतर जेव्हा खरी बाब या तरुणीला समजली तेव्हा तिला धक्का बसला. त्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या प्रियकराच्या संपर्कात आली. आता तिने तिच्या प्रियकराशी विवाहा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोघांचेही नातेवाईक त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे दोघेही विवाह करण्याच्या मतावर ठाम आहेत.

Tags: crime newsFamilypolice
Previous Post

तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी असं काही की स्वत:च पोलिसांकडे आला आरोपी!

Next Post

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांची अकोला कार्यालयास भेट

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांची अकोला कार्यालयास भेट

काबूल विमानतळावरुन १५० नागरिकांचे अपहरण, बहुतांश भारतीयांचा समावेश

काबूल विमानतळावरुन १५० नागरिकांचे अपहरण, बहुतांश भारतीयांचा समावेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.