अकोट- आजकाल वाढदिवस म्हटलं की वर्षभरातील सर्वात आनंदाचा दिवस,मात्र हा आनंदाचा दिवस प्रत्येकजण आप आपल्या आवडीने साजरा करतो.मात्र दिवसेंदिवस हा दिवस हजारो रुपयाची उधळून केप कापून आणि दारू पिऊन साजरा करणे ट्रेंडच बनवला आहे.
मात्र या सर्व गोष्टींना वाव न देता वडनेर गंगाई ता.दर्यापूर येथिल युवा उद्योजक तथा युवासेनेचे दर्यापूर ता.उपाध्यक्ष अभिजीत मावळे यांनी आपला वाढदिवस सध्या काळाची गरज पाहता निसर्गा समतोल राखण्या साठी वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे.याचं गोष्टीं आणि निसर्ग सेवा म्हणून अभिजित मावळे यांनी पुंडा नंदीग्राम येथील वृक्षमित्र परिवारास वृक्षारोपनाकरिता शंभर ट्रीगार्ड वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून देऊन एक समाजात आदर्श निर्माण केला आहे.
अश्या अत्यंत साधा पध्दतीने आणि निसर्ग सेवा करून वाढदिवस साजरा केल्यानं अभिजित मावळे यांचे कौतुक होत आहे.
वृक्षमित्र पारिवार पुंडा नंदीग्रामच्या छोटयाशा निसर्ग सेवेच्या कार्याची दखल घेऊन वाढदिवसा निमित्ताने शंभर ट्रीगार्ड मदत दिल्या वृक्षमित्र परिवार पुंडा नंदीग्राम कडून आभार मानण्यात आले.