पातुर (सुनिल गाडगे): दिनांक:-१८/०८/२०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे आगीखेड येथील विधवा महिला श्रीमती कांताबाई भारतशिंग तवर यांचे राहते घर रात्री.३:३० वा.संपुर्णत कोसळले असुन त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
या घटनेची माहिती आगिखेडचे कर्तव्यदक्ष तलाठी श्री. एम.पी.नाईक यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन स्थळ पाहणी केली.
आगिखेड येथील सरपंच सौ. पूनमताई उगले व गावकरी पंच यांचे समक्ष पंचनामा करून अहवाल तयार केला.या अहवालाची दखल घेत पातूर तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.दीपक बाजड सर व मंडळ अधिकारी श्री.तानाजी सांगळे यांनी शासन निर्णया नुसार सदर कुटुंबास सानुग्रह मदत देण्यात आली.सानुग्रह मदत रुपये ५०००/- तलाठी श्री. एम.पी.नाईक व सरपंच, आगिखेड सौ.पूनमताई उगले यांचे हस्ते देण्यात आली. घटनेनंतर निराधार कुटुंबाचे तात्पुरते राहण्याची व्यवस्था आगिखेड गावातील सामाजिक सभागृहात करण्यात आली आहे