• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

अफगाणिस्तान : सैतानी तालिबानचे महिलांवर अत्याचार

Our Media by Our Media
August 20, 2021
in आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
235 2
0
सैतानी तालिबानचे महिलांवर अत्याचार
35
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

काबूल : घुसखोरी करून अफगाणिस्तान बळकावणार्‍या जहाल दहशतवादी संघटना तालिबान्यांचे सैतानी अत्याचार गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांवर सुरूच आहेत. तालिबान्यांच्या क्रौर्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. आता तर त्यांनी महिला आणि लहान मुलांनाही लक्ष्य केले आहे. वृत्तवाहिन्यांतील महिला निवेदकांना बंदी घालण्यात आली आहे. हजारा समुदायातील तरुण मुलींना विवाहासाठी बळजबरी केली जात आहे. त्यांच्या या क्रौर्यामुळे भयभीत झालेल्या मुलींना पालक काबूलकडे पाठवत आहेत.

काही धाडसी महिलांनी तालिबान्यांच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली असून संघर्षाचा एल्गार पुकारला आहे. गेल्या 5 दिवसांत तालिबान्यांनी 40 पेक्षा जास्त नागरिकांना ठार मारले आहे.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

अफगाणिस्तान मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर शांततेची भाषा करणार्‍या तालिबानच्या ‘कथनी आणि करणी’त मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार सुरू आहेत. पुरुषांच्या चेहर्‍याला काळे फासले जात आहे. त्यांना आसूडाचे फटके दिले जात आहेत. मारहाणीतून लहान मुलेही सुटलेली नाहीत.

लिबानकडून नागरिकांमध्ये आपला धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रकार सुरू आहेत. काबूल विमानतळाबाहेर प्रतीक्षा करणार्‍या व्यक्‍तींना मंगळवारी टोकदार शस्त्रे, चाबूक, लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मारहाणीत 12 नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. तत्पूर्वी जे लोक देश सोडून जाणार असतील, त्यांना रोखले जाणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले होते. आता मात्र फक्‍त विदेशी नागरिकांनाच देशाबाहेर सोडले जात आहे. अफगाणिस्तानमधील जनतेला बाहेर जाऊ दिले जात नाही.

हेरात प्रांतात लोकांच्या तोंडाला काळे फासून काढली धिंड

हेरात प्रांतात काही नागरिकांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या गळ्यात दोर बांधून रस्त्यांवरून फिरवल्याची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. एका तरुणीचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यात ती अमेरिकन सैन्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.

याशिवाय ठिकठिकाणी गस्त घालणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.

हजारा समाजाच्या मुलींशी जबरदस्तीने विवाह

अफगाणिस्तानातील हजारा समाजाच्या मुलींशी तालिबानी जबरदस्तीने विवाह करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे हा समाज सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. अफगाणिस्तानातील एकूण लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के इतकीच त्यांची संख्या आहे. या समाजातील नेत्यांच्या मूर्तींचीही तालिबान्यांनी तोडफोड केली होती.

मुलांच्या जीवाशी खेळ

तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला लहान मुलांना घेऊन विमानतळाकडे धाव घेत आहेत. यात एकीकडे तालिबानी दहशतवादी आणि दुसरीकडे अमेरिकी आणि ब्रिटीश सैनिक यांचा पहारा यातून विमानतळावर जाताना त्यांची दमछाक होते. अशावेळी लहान मुलांना काटेरी तारांच्या कुंपणाच्या बाहेर फेकले जाते. मात्र सैनिक त्यांना शिताफीने झेलून मुलांचे प्राण वाचवित असल्याचे दृष्य विचलीत करणारे होते.

Tags: Afganistantaliban terroristswomen atrocities
Previous Post

पं. नेहरू, वाजपेयी आदर्श नेते; केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

Next Post

औषधात पैसे खाणाऱ्यांकडे गोमूत्र? ; नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू
Featured

T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू

May 29, 2024
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

May 16, 2024
Covishield-vaccine
Featured

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

May 8, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान
Featured

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

March 12, 2024
Next Post
नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका

औषधात पैसे खाणाऱ्यांकडे गोमूत्र? ; नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका

देवेंद्र फडणवीसांनी

देवेंद्र फडणवीसांनी थेट तालिबानी विचारांशी केली स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची तुलना! म्हणाले…

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.