अकोला: दि.19 राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे शनिवार दि. 21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.21 रोजी सकाळी 10 वाजता शेगांव येथून मोटारीने बाळापुर जि.अकोलाकडे प्रयाण व सकाळी साडेदहा वाजता बाळापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता बाळापूर नगर परिषदेच्या ग्रंथालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वाजता राखीव व दुपारी दोन वाजता बाळापूर जि.अकोला येथून मोटारीने अकोलाकडे प्रयाण.
दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व अकोला जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकीस उपस्थिती, सायंकाळी चार वाजता जिल्हा कॉग्रेस कमिटी कार्यालय, अकोला येथे राखीव, सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे राखाीव.
रात्री सव्वाआठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने अकोला रेल्वे स्टेशनकडे प्रयाण, रात्री साडेआठ वाजता रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. 55 मि.नी अकोला येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.