तेल्हारा: १५ आॅगष्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने विविध क्रिडा स्पर्धा, देशभक्ती पर गित गायन स्पर्धा व विशेष वीर मातांचा संन्नमान सोहळा स्थानीक क्रिडा संकुल येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निवृत्त सुभेदार श्री.सुरेश जवकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर, माजी नगराध्यक्ष श्री.दयालसिहं भाऊ बलोदे, पोलिस निरीक्षक श्री.नितीन देशमुख , डॉ सौ. संजीवनीताई बिहाडे, श्री रामप्रभु दादा तराळे, श्री.भवानीप्रताप देशमुख,प्रा.सचिन दाटे, श्री.गजानन भाऊ
गायकवाड, श्री.प्रविणपोहरकार,प्रा.सचिन गव्हाळे, प्रा.धिरज इंगळे, उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा संघटनेच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक श्री.पांडुरंग खुमकर, तर आभार प्रदर्शन माजी सैनिक श्री.दिनेश भिकाजी माकोडे यांनी केले.
विशेष विरमातांचा सन्मान सोहळा
नगराध्यक्षा सौ जय श्रीताई पुंडकर व डॉ.सौ.संजीवनीताई बिहाडे.यांचे कडून विशेष विर माता की ज्याच्या पतींच मुलं लहान असतांना निधन झालं अशा कठीण परिस्थितीत संसाराची सर्व जबाबदारी व्यवस्थीत पार पाडत मुलांना लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन देशरक्षणाकरीता *भारतीय सैन्यात*पाठविलं अशा सर्व विर मातांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये विशेष करुन श्रीमती यशोदा बाई गि-हे (घोगले), अक्तरबी सैय्यद मुनशी, श्रीमती गिताबाई अशोक कांगटे, श्रीमती राजकंन्या राजीव कंठाळे, श्रीमती सुनीता हरीदास भोपळे, श्रीमती सोळंके ताई, श्रीमती मदनकार ताई, श्रीमती मानकर ताई या सर्व विर मातांचा अतीशय भावनिक वातावरणात सत्कार करण्यात आला.या विर मातांचा संघर्ष व त्यागाची कहाणी ऐकून सर्वांचे डोळे भरून आले होते.
त्यानंतर विविध क्रिडा स्पर्धांचे पारीतोषीक मान्यवरांनकडुन देण्यात आले.यामध्ये फुटबॉल स्पर्धा प्रथम पारितोषिक श्री गजाननभाऊ गायकवाड व सुनिल भाऊ राठोड यांचे कडुन डब्लुफायर फुटबॉल क्लब ने पटकाविले.कबड्डी स्पर्धा प्रथम पारितोषिक ऊमरा कबड्डी संघास माजी सैनिक संघटनेकडुन देण्यात आले. व्दितीय पारितोषिक चंफामाता कबड्डी संघ, माळेगांव (बाजार) यास स्व.गजानन सोनटक्के स्मृती प्रित्यर्थ देण्यात आले.
मुलींची रनिंग स्पर्धा
प्रथम – कु. वैष्णवी गजानन चव्हाण हीला श्री.प्रशांतदादा विखे यांच्या कडून तर व्दितीय कु. कोमल रायबोले हीला श्री. रिंकुभाऊ अग्रवाल यांच्या कडून तर तृतीय कु. गिता दुब्बल हिला श्री. अरविंद दादा तिव्हाणे कडून देण्यात आले.
मुलांची रनिंग स्पर्धा
प्रथम पारितोषिक हर्षद गजाननराव अवचार यांना श्री.सुधाभाऊ गावंडे यांच्या कडून तर व्दितीय लक्ष्मण बाहेकर यांना श्री.निलेशभाऊ धनभर यांच्या कडून देण्यात आले.
प्रोत्साहन पर पारितोषिकांनमध्ये अर्थव पार्थिकर , गिरीश ढवळे ,वेदांत लव्हाळे , आरूष , कु.सृती , कु.विधी वासनकर ,रूद्र वासनकार यांना सहजयोग ध्यान केंद्र तेल्हारा यांच्या कडून देण्यात आले.
गित गायन स्पर्धा
गट -१ (५ ते१५ वयोगटातील)
प्रथम पारितोषिक – दिव्यांग कु. समिक्षा लक्ष्मीकांत माकोडे. माळेगांव (बाजार) हीला श्री.नागोराव खारोडे सर यांच्या कडून तर व्दितीय पारितोषिक – कु.सेजल ठाकुरदास डांगे हिला माजी सैनिक श्री.दिनेश भिकाजी माकोडे यांच्या कडून तर तृतीय पारितोषिक – कु.सृती नळकांडे हिला विशाल जळमकार सर ,(माऊली संगित क्लासेस तेल्हारा) यांच्या कडून आले.
गट – २ (१६ ते ६० वयोगटातील)
प्रथम पारितोषिक श्री गोपाल ठाकुर यांना श्री.शिंगणे सर यांच्या कडून तर व्दितीय पारितोषिक श्री. सागर राऊत यांना डॉ.सौ.संजीवनीताई बिहाडे यांच्या कडून तर तृतीय पारितोषिक कु. सानिका वाघमारे हिला श्री.विशाल जळमकार सर (माऊली संगित क्लासेस तेल्हारा) यांच्या कडून देण्यात आले.
यावेळी दिव्यांग कु.समिक्षा लक्ष्मीकांत माकोडे ही दोन्ही डोळ्यांनी दृष्टीहीन मुलीने देशभक्ती पर गित गायनाने सर्व श्रोते भाऊक झाले व सर्वांनी कु.समिक्षा लक्ष्मीकांत माकोडे चे कौतुक केले.
गायन स्पर्धेत परीक्षक म्हणून सुनिता ताई काकड मॅडम , विशाल जळमकार सर ( माऊली संगित क्लासेस तेल्हारा) व भजन सम्राट श्री.विजय कुयटे सर यांनी पाहिले.
यावेळी मान्यवरांमध्ये श्री.दयालसिहंजी बलोदे, नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर, डॉ.सौ.संजीवनीताई बिहाडे, पोलिस निरीक्षक श्री.नितीन देशमुख, श्री.भवानीप्रताप देशमुख व प्रा.सचिन थाटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थी, महीला वर्ग ,नागरीक,शिक्षक व माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी शहरातील श्री.साई गृप तेल्हारा यांच्या कडून सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती व श्री एजेंसी तेल्हारा कडून खाऊची व्यवथा करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री.राम पाऊलझगडे सर कोषाध्यक्ष सुमीत गायगोळ, श्री.सुनिल दातकर साहेब श्री.नंदकिशोर दाते साहेब, श्री.रामेश्वर घंगाळ सर, श्री.अरूण हिवराळे.साहेब, श्री.श्रीकांत ताथोड साहेब, श्री.संजय सुईवाल सर श्री.सुरेश म्हसाये साहेब, श्री.टोलमारे साहेब,शेख चाँद शेख मुन्शी, श्री.राजु परमाळे साहेब, श्री.वसंत रोठे साहेब, श्री.अशोकराव मानकर साहेब, श्री. लासुरकार साहेब , निवृत्त सुभेदार श्री अशोकराव म्हसाळ साहेब, श्री. गायगोळ साहेब यांनी अथक परीश्रम घेतले.
राष्ट्र वंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.