• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली. हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे आपल्याला आता ब्लॅक फंगस होईल या भीतीने दोघांनी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं.

Team by Team
August 17, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
213 2
0
suicide death
36
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

बंगळुरु : ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली. हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे आपल्याला आता ब्लॅक फंगस होईल या भीतीने दोघांनी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं.

या सुसाईड नोटमध्ये पती म्हणतो, “माझ्या पत्नीला मधुमेह आहे, न्यूज चॅनल्सनी दाकवलं आहे, त्यानुसार ज्या मधुमेही रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका आहे. त्यामुळे आपले अवयव गमावू शकतो. त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला” (Mangalore Couple Suicide Karnataka Couple died by suicide after infected with COVID19 black fungus. )

रमेश (40) आणि गुना सुवर्णा (35) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही मंगलोरमध्ये एका आपर्टमेंटमध्ये राहात होते. रमेशची पत्नी गुना सुवर्णा ही मधुमेहाने पीडित होती.

सुसाईड नोट

गेल्या काही दिवसापूर्वी दोघांनाही कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे व्यथित झालेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने आपल्या मेसेजची ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांना पाठवली होती. यामध्ये त्यांनी ब्लॅक फंगसमुळे भीती वाटत असल्याचं म्हणत आम्ही आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांकडून शोधाशोध 

यावर पोलीस आयुक्तांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. त्यांनी तातडीने या दाम्पत्याचा शोध सुरु केलं. इतकंच नाही तर त्यांनी मीडियालाही आवाहन करुन, या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत या दाम्पत्याने आत्महत्या केली होती.

रमेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गुना सुवर्णाच्याही आरोग्याच्या समस्येबाबत लिहिलं आहे. गुना सुवर्णाला अपत्य होत नसल्याने, ती समाजात वावरताना दचकत होती. सातत्याने तिला विचारणा होत असल्याने तिला अवघडल्यासारखं वाटत होतं.

अंत्यसंस्कारासाठी 1 लाख, घरमालकांची माफी

पुढे पत्नीनेही याच सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ती म्हणते, “मी आणि माझ्या पतीने ठरवलं आहे की आमच्यावर पारंपारिक अंत्यसंस्कार व्हावेत, त्यासाठी आम्ही 1 लाख रुपये ठेवले आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त एन शशीकुमार, शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांनी आमच्या अंत्यसंस्कारासाठी सहकार्य करावं”

इतकंच नाही तर घरातील साहित्य गरिबांना वाटा, आम्ही आमच्या घरमालकांची माफी मागतो, असंही या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

Tags: black fungasCouple Suicide CaseSuicide case
Previous Post

विविध प्रकारच्या राख्यांनी सजली शहरातील बाजारपेठ

Next Post

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’

PM Kisan

दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000, काय आहे मोदी सरकाची योजना?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.