काबूल : माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. असे सांगत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहिले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केल्यनांतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. असे वृत्त सर्वत्र पसरले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशवासीयांना भावूक पत्र लिहित देश का सोडला? याचे कारण दिले आहे.
राष्ट्राध्यक्ष घनी यांनी पत्रात काय म्हटलंय?
माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते.
तालिबानने मला हटवले आहे. काबूलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.
मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते.
आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे.
तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असे घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर काबूल शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.
अफगाणिस्तान संघर्ष : तालिबानी आहेत तरी कोण?
पश्तू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. अफगाणिस्तानातून सोव्हिएट सैन्याने माघार घेतल्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. धार्मिक समारंभातून तालिबानचा उदय झाला, असं मानलं जात. कडवट सुन्नी इस्लामचा प्रचार करणाऱ्या या सभांना सौदी अरेबियातून पैसा मिळत होता.