मुंबई : तर पुन्हा लॉकडाऊन : राज्यात आजपासून (दि.१५) सरसकट संध्याकाळी १० वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे एक प्रकारे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजधानी मुंबईत ध्वजारोहण केल्यानंतर राज्यासमोर असलेल्या कोरोना संकटावर भाष्य केले. यावेळी त्यांनी संकट अजूनही टळलं नसल्याचे सांगत राज्यातील जनतेला सावधगिरी पाळण्याचा सल्ला दिला.
ध्वजारोहणानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून संबोधित करताना सांगितले की,गेल्या दीड वर्षापासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यातून मुक्तता होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. निर्बंध शिथिल केली असली, तरी संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांमध्ये कोरोना पुन्हा उसळला आहे. तसे होऊ नये म्हणून शिथिलतेसोबत इशारा दिला आहे. तो नागरिकांनी लक्षात घ्यावा.
रेल्वे : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना कालखंडात आरोग्य सुविधा आपण वाढवत आहोत. अजूनही ऑक्सिजन कमतरता चिंतेची बाब आहे. ऑक्सिजन साठ्याचे प्रमाण ठरवून शिथिलता दिली आहे. ऑक्सिजन पुरवठा मर्यादेच्या पुढे गेल्यास कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो.