तेल्हारा( प्रतिनिधी)- ईसापुर येथे ग्रामपंचायच्या वतीने जंतुनाशक फवारणी करुन फाॕगींग मशीनव्दारे धुरळणी करण्यात आली सदर फवारणी व धुरळणी वातावरणातील बदल आणी गावातील मच्छरांचे वाढलेले प्रमाण गावामध्ये डेंगु सदृष्य तापाची लहान मुलांना आणी नागरीकांना बाधा झाली होती परंतु त्यांणी आपला उपचार खाजगी रुग्णालयात घेतला होता गावातील नागरीकांचे आरोग्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असल्यामुळे सरपंच मिराताई आनंद बोदडे आणी वैद्यकिय अधिकारी सुजाता भिमकर डाॕ.उज्वल व्यवहारे, सचिव वर्षा फाळके ,यांच्या समन्वयातुन गावात जंतु नाशक फवारणी आणी फाॕगींग मशीन व्दारे धुरळनी करण्यात आली यावेळी उपसरपंच महादेवराव नागे यांणी गावातील नागरीकांना आवाहन करुन आपला परिसर स्वच्छ ठेवुन कच-याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी तसेच आपल्या घराच्या परिसरामध्ये पाणी साचनार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले गावात जंतुनाशक फवारणी आणी फाॕगींग मशीनव्दारे धुरळनी केल्या बद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले .
फवारणी करतेवेळी इसापुर येथिल धनगर समाजाचे नेते दिनेश घाटोळ ,पञकार आनंद बोदडे खंडुजी घाटोळ ,अनंता रेलकर, शंकरराव घाटोळ. राहुल बोदडे, देवानंद बोदडे ,शरद बोदडे, गौतम बोदडे, ग्रा.प. शिपाई सोनु मोडोंकार यांणी सहकार्य केले.