अकोला :-प्रशिक्षनाच्या नावा खाली एका युवतीवर सतत चार वर्ष अत्याचार करून शारीरिक शोषण करणाऱ्या नराधमाला अकोला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या नराधम प्रशिक्षकाने अकोला शहरात शिकणार्या एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपाखाली रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपीला ताब्यात घेतले शिस्त आणि शारीरिक विकासाकरिता प्रशिक्षण देणारा हा नराधम प्रशिक्षक अकोला शहरातील हरिहर पेठ येथील रहिवासी आहे आरोपीचे नाव अमित जाधव असून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सलग चार वर्षे विविध ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार सदर युवतीने रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये केली होती या तक्रारीची दखल घेत रामदासपेठ पोलिसांनी आरोपी अमित जाधव याला अटक केली आहे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत