वाडेगाव(डॉ चांद शेख)- कोरोणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता खबरदारी म्हणून वाडेगाव येथे डोअर टू डोअर सॅनेइझरची फवारणी करण्यात येत आहे. याकामी दोन टिम वेगवेगळ्या भागात फवारणी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोणाच्या तिसऱ्या लाटेपासुन बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत त्यातीलच केंद्र शासनाच्या आयुष्य मंत्रालयाकडून गावा गावात डोअर टु डोअर सॅनेटाइझरची फवारणी करण्यात येत आहे. वाडेगावात सुद्धा प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजावर सॅनेटाईझरची फवारणी करण्यात येत आहे. याकामी दोन टिम गावातील वेगवेगळ्या भागात फवारणी करतांना दिसत आहेत त्यांना याकामी ग्रामप्रशासनाकडून मोलाचे सहकार्य लाभत आहे. येथे फवारणीला सुरुवात करतेवेळी वाडेगाव ग्रामपंचायतचे सरपंच मेजर मंगेश तायडे, ग्रामविकास अधिकारी गजानन डिवरे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. फवारणीसाठी आदेश येवले, योगेश चोरे, नागोराव आखरे, अतुल आखरे,अक्षय आकणे, संतोष आखरे, अनिल आखरे,रंणजीत कचाले, अशोक कड, गोपाल गावंडे,अमोल गावंडे स्वप्नील आखरे, यांचे सहकार्य लाभत आहे.