अकोला– महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) ही सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती, तसेच भूस्खलनामुळे दळवळणास निर्माण झालेल्या अडचणी पाहता ही परीक्षा दि.९ ऐवजी गुरुवार दि.१२ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे यापूर्वी निर्गमित केलेले प्रवेशपत्र दि.१२ रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.