• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

IND vs ENG : विराट-शास्त्रींसाठी दोन जागांची डोकेदुखी, अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापुढे अंतिम 11 खेळाडू निवडणं डोकेदुखी ठरणार आहे.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 4, 2021
in आंतराष्ट्रीय, क्रीडा
Reading Time: 1 min read
102 6
0
IND vs ENG : विराट-शास्त्रींसाठी दोन जागांची डोकेदुखी, अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

India's captain Virat Kohli (R) walks with headcoach Ravi Shastri before the start of the first day of the fourth Test cricket match between India and England at the Narendra Modi Stadium in Motera on March 4, 2021. (Photo by Sajjad HUSSAIN / AFP) / IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE

16
SHARES
773
VIEWS
FBWhatsappTelegram

नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधीच शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान बाहेर झाले आहेत, तर सरावादरम्यान मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिली टेस्ट खेळू शकणार नाही, त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यापुढे अंतिम 11 खेळाडू निवडणं डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या काही सीरिजपासून टीम इंडिया मॅचच्या 24 तास आधी टीम घोषित करते, यावेळी मात्र आपण टॉसवेळीच याची घोषणा करू, असं विराटने सांगितलं.

पहिल्या टेस्टमध्ये ओपनर म्हणून मयंक अग्रवालऐवजी केएल राहुल आणि ऑलराऊंडर म्हणून जडेजा किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. सध्या भारतीय टीममध्ये फक्त दोनच ओपनर आहेत, त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची जोडी निश्चित मानली जात आहे. राहुलने सराव सामन्यातमध्ये शतक करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने हनुमा विहारीलाही ओपनिंगला खेळवलं होतं, पण त्याला चमकदार कामगिरी दाखवता आली नव्हती.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये विराट कोहलीने रवींद्र जडेजाला कमी ओव्हर बॉलिंग दिली होती, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट शार्दुल ठाकूरला खेळवू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुलने धमाकेदार अर्धशतक केलं होतं, तसंच 7 विकेटही घेतल्या होत्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात शार्दुलची भूमिका मोलाची ठरली होती. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर शार्दुल बॉलिंगमध्येही उजवा ठरू शकतो.

मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा फास्ट बॉलिंगचं आक्रमण सांभाळत असले तरी दोघांच्या फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळाला आहे, तसंच बुमराह कंबरेच्या फ्रॅक्चरनंतर आधीसारखं यश मिळवण्यात अपयशी ठरत आहे, त्यामुळे मोहम्मद सिराजचा पर्यायही विराटकडे उपलब्ध आहे.

भारताची संभाव्य प्लेयिंग 11

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा/शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा/मोहम्मद सिराज.

Tags: India Vs EnglandRavi Shastrivirat kohli
Previous Post

आर फॅक्टर आठ राज्यात वाढतोय, कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही

Next Post

IND vs ENG : हिरव्यागार पिचमुळे भारताचं नुकसान का फायदा? असं आहे पहिल्या दिवसाचं हवामान

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू
Featured

T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू

May 29, 2024
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

May 16, 2024
Covishield-vaccine
Featured

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

May 8, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान
Featured

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

March 12, 2024
Next Post
IND vs ENG : हिरव्यागार पिचमुळे भारताचं नुकसान का फायदा? असं आहे पहिल्या दिवसाचं हवामान

IND vs ENG : हिरव्यागार पिचमुळे भारताचं नुकसान का फायदा? असं आहे पहिल्या दिवसाचं हवामान

MPSC

MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अखेर जाहीर; या दिवशी होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.