• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

पृथ्वी शॉ इंग्लंडला पोहोचला, या 3 खेळाडूंचे टेन्शन वाढले, टीममध्ये परतण्याची शक्यता

भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी मालिका (IND vs ENG ) 4 ऑगस्टपासून नॉटिंघम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज येथे सुरू होत आहे.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 4, 2021
in आंतराष्ट्रीय, क्रीडा
Reading Time: 1 min read
125 2
0
पृथ्वी शॉ इंग्लंडला पोहोचला, या 3 खेळाडूंचे टेन्शन वाढले, टीममध्ये परतण्याची शक्यता
21
SHARES
904
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी मालिका (IND vs ENG ) 4 ऑगस्टपासून नॉटिंघम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज येथे सुरू होत आहे. विराट कोहली या मालिकेत अनेक युवा खेळाडूंवर जबाबदारी देवू शकतो. (IND vs ENG Test Series)

पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये दाखल

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर मंगळवारी इंग्लंडला पोहोचला आहे, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हाही त्याच्यासोबत उपस्थित होता. टीम इंडियाच्या जखमी कसोटी खेळाडूंची बदली म्हणून दोघांनाही बोलावण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना क्वारंटाईन नियमांनुसार पहिल्या कसोटीत संधी मिळणार नाही.

पृथ्वी या 3 खेळाडूंची जागा घेऊ शकतो

विशेषत: जखमी शुभमन गिल (Shubman Gill) याच्या जागी पृथ्वी शॉ याला संधी दिली जाऊ शकते. जर शॉला कसोटीत संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरी केली तर अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी ही धोक्याची घंटा असेल.

1.मयांक अग्रवाल

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका (IND vs ENG Test Series) सुरू होण्याच्या फक्त 2 दिवस आधी सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) जखमी झाला आणि नॉटिंगहॅम कसोटीतून बाहेर पडला. पहिल्या कसोटीत तो चांगला खेळेल अशी मयांकची अपेक्षा होती. आता पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये आल्यामुळे मयांकचे टेन्शन वाढणार आहे, कारण पृथ्वीही मयांक प्रमाणेच ओपनिंग करू शकतो आणि टेस्ट टीममधूनही त्याचे कार्ड क्लीअर करू शकतो.

2. चेतेश्वर पुजारा

ब्रॅड हॉग सारख्या दिग्गजांचाही विश्वास आहे की टीम इंडियामध्ये पृथ्वी शॉ चेतेश्वर पुजारा याच्यासाठी (Cheteshwar Pujara) सर्वोत्तम बदली ठरू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, पुजाराने गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक झळकावले नाही. पुजाराने शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. अशा परिस्थितीत, क्रमांक -3 साठी नवीन चेहऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.

3. अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असला तरी त्याची जागा पृथ्वी शॉ घेऊ शकतो. त्यामुळे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (ICC WTC Final) अजिंक्य रहाणे कडून बऱ्याच अपेक्षा होत्या, मात्र तो पूर्ण करु शकला नाही. रहाणेने अखेर मेलबर्न कसोटीत शतक झळकावले. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंवर जास्त अवलंबून राहणे टीम इंडियाला हानी पोहोचवू शकते, मग पृथ्वीसारख्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

पृथ्वीने शेवटची कसोटी कधी खेळली?

पृथ्वी शॉ डिसेंबर 2020मध्ये अॅडलेडमध्ये शेवटची कसोटी खेळला. ज्यात विराट कोहलीचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात 36 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर पृथ्वीला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आलेले नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

Tags: India Vs EnglandPrithvi Shawsports news
Previous Post

Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

Next Post

Tokyo Olympics Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli: लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू
Featured

T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू

May 29, 2024
हा आहे सर्वात महागडा आंबा..!
Featured

हा आहे सर्वात महागडा आंबा..!

May 16, 2024
Covishield-vaccine
Featured

अ‍ॅस्ट्राझेनेका लस जगभरातून परत मागवली कोव्हिशिल्ड बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय

May 8, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान
Featured

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

March 12, 2024
Next Post
Tokyo Olympics Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli: लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

Tokyo Olympics Lovlina Borgohain vs Busenaz Surmeneli: लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

health worker corona warrier

आर फॅक्टर आठ राज्यात वाढतोय, कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.