तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या महामारीमुळे जनसामान्यांच्या हाताला काम नसल्याने जनसामान्यां माणुस आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आपल्या परिवाराचे पोषण करण्याकरिता कबाळ कष्ट करीत आहे त्याच स्वतःच्या मुलांचे उज्वल भविष्य बघता कित्येक जनसामान्यांनी आपल्या मुलांचे ऍडमिशन कॉन्व्हेंट मध्ये केले आहेत.कोरोनामुळे हाताला काम नसल्याने कित्येक पालक आपल्या मुलांची शालेय फी भरू शकले नाहीत व आज रोजी पण भरू शकत नाहीत अशा विविध कारणाने पालक हलभल झाले आहेत त्याच शाळांची ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे त्याकरिता पालक कॉन्व्हेंट मध्ये जाऊन आमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणामध्ये समाविष्ट करून घ्या आम्ही नंतर फी भरू अशे कॉन्व्हेंटच्या प्राध्यापक व अध्यक्ष यांना विनंती करत आहेत तरी सुद्धा कॉन्व्हेंट मधील प्राध्यापक व अध्यक्ष हे पालकांच्या विनंतीवर कोणत्याच प्रकारचा विचार न करता सक्तीने फी वसुली करत आहे पालकांकडे पैशे नसल्याने पालक शाळा सोडण्याचा दाखल मागत आहे कारण कॉन्व्हेंट मधून मुलांना काढून सरकारी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश समाविष्ट करून कसे बसे त्यांचे शिक्षण पूर्ण करू तरी पण कॉन्व्हेंटचे अध्यक्ष व प्राध्यापक मागील फी भरा नाहीतर शाळा सोडण्याचा दाखल मिळनार नाही अशाप्रकारची सक्ती करत आहे व एक वर्षांनंतर अभ्यासक्रम बदलून जनसामान्यांना आर्थिक भुडंद देत आहे अशा विविध कारणांमुळे जनसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे कॉन्व्हेंट शाळांच्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याचा धोका निर्माण होत आहे अशे होऊ नये करिता आपण यावर ठोस पाऊल उचलत लवकरात लवकर तालुक्यातील अशा शाळांवर कारवाई करावी व कॉन्व्हेंट मधील फी वसुलीची सक्ती थांबवुन विनाशर्थ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे तशे आम्हास पत्राद्वारे सात दिवसाच्या आत कळवावे अन्यथा शिवसेना व युवासेना तेल्हारा शहर तालुक्याच्या कुठल्याही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील.शिवसेना युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतिने निवेदन द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संजय अढाउ जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख तालुका
प्रविण वैष्णव तालुका समन्वयक अजय गावंडे पप्पू शेठ सोनटक्के राम वाकोडे संजय लांडे प्रज्वल मोहोड नंदकिशोर निमकर्डे निलेश उमाळे अतुल घंगाळ प्रदीप राजुस्कर रविंद्र म्हसाळ श्याम माहोरे यांच्या सह शिवसेना युवासेनेच्या आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनाद्वारा केलेल्या मागण्या
१) तेल्हारा शहर व तालुक्यातील कॉन्व्हेंट शाळांमधील सक्तीची फी वसुली थांबवावी.
२) विद्यार्थ्यांची मागील व सुरू वर्षाची फी न भरता ऑनलाईन शिक्षणाकरिता समाविष्ट करून घेण्यात यावे व फी ची सक्ती न करता शाळा सोडण्याचा दाखल देण्यात यावा.
३) जनसामान्यांन पालकांचा आर्थिक विचार करता सलग तिसऱ्या वर्षी नवीन अभ्यासक्रम न बदलता किमान ५ वर्षांनंतर बदलण्यात यावा.
४) आतापर्यंत तेल्हारा तालुका व शहरातील किती विद्यार्थ्यांनी फी भरून ऑनलाईन शिक्षण सुरू केले व आर्थिक मुळे फी न भरू शकल्यामुळे किती विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत आहे ही माहिती देण्यात यावी.
५) शासनाच्या जीआर नुसार १५% फी माफ करण्याच्या आदेशाची अंबलबजावणी करण्यात यावी.
६) विध्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू असता शाळांनी इतर विविध चार्जेस आकारू नये