तेल्हारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची आढावा बैठक स्थानिक विश्रामगृह तेल्हारा येथे घेण्यात आली या वेळी अनेक विषयावर चर्चा करुन आढावा बैठकीत जुनी कार्यकारीणी सर्वानुमते बरखास्त करुन नविन नियुक्ती साठी मंजुरी देन्यात आली याच वेळी अनेक नविन पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघात प्रवेश केला पदग्रहण सोहळा पार पडला या वेळी बैठकीत बोलतांना महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे यांच्या अध्यक्षतेखाली तिन प्रमुख पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी पत्रकार विलास मुरलीधर बेलाडकर यांच्या नावाची घोषणा केली तर ता.उपाध्यक्ष पदी दिपक विश्वास दारोकार आणी तालुका सरचिटणीस पदी रक्षीत जिवन बोदडे यांची नियुक्ती करण्यात आली,यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष मा.पुरषोत्तम पाटील आवारे यांनी संघातील सर्व पत्रकार बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष रहा असे आव्हानही या वेळी त्यांनी केले, तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधाकरराव खुमकर यांनी व राजीव पिसे निवासी संपादक दैनिक भास्कर यांनी देखील मार्गदर्शन करत संघवाढी बाबत सुचना दिल्या या वेळी सरचिटणीस महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ सुधाकरराव खुमकर यांनी नवनियुक्त पदाधीकार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच नवनियुक्त तालुका अध्यक्ष विलास बेलाडकर तालुका उपाध्यक्ष दिपक दारोकार, सरचिटणीस रक्षीत बोदडे,यांचे सर्वच स्थंरावरुन कौतुक होत आहे.
यावेळी तेल्हारा तालुक्यातील विविध वृत्तपत्रांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल कुमार धुरडे यांनी केले तर आभार रक्षीत यांनी मानले यावेळी महेंद्र कराळे सर,किरण सेदानी, केशवराव कोरडे, गोवर्धन गावंडे, गणेशराव उमाळे, रितेश टिटवाल, गुरुदेव ईसमोरे, ज्ञानेश्वर बहाकर ,दीपक दारोकार, संदीप सोळंके, शुभम सोनटक्के, गोकुळ हिंगणकर ,धम्मदीप बोदडे, , अनिल भाकरे ,सुनील कुमार, गणेश सोनटक्के, धुरडे, रविंद्र ढाकरे, गोपाल विरघट,विनोद सगणे, महेंद्र तायडे, श्रीकृष्ण वायकर, संघपाल गवारगुरु ,रक्षीत बोदडे, सुनिल गवई,शुभम सोनटक्के, आदी पत्रकार उपस्थित होते