अकोला– सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेवून उत्तीर्ण झाले असतील अशांना महामंडळाकडून गुणानुक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. तरी पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनींनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड, फोटो, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून दि.१० ऑगस्ट पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. कौलखेड रोड, नालंदा नगरच्या बोडाजवळ, आरोग्य नगर चौक, अकोला येथे दोन प्रतित अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. उशिरा प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.