पातूर (सुनिल गाडगे) : ग्लोबल टायगर डे चे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाघ वाचवा चा संदेश देत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
29 जुलै रोजी ग्लोबल टायगर डे साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वाघ वाचवा हा संदेश देत विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन निसर्ग कट्टा या संघटनेने केले होते. निसर्ग कट्टा च्या आवाहनाला प्रतिसाद देत पातुरच्या चिमुकल्यांनी वाघ वाचवा मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःचा चेहरा वाघासारखा रंगवून मला वाचवा असा संदेश दिला. तसेच पर्यवरण वाचवा, वाघ वाचवा ही प्रतिज्ञा विदयार्थ्यांनी घेतली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात वर्ग पहिली मधून दक्ष येनकर, स्वरा गवई, ऋतुराज चिंचोळकर, संग्राम इंगळे, पार्थ बोचरे, शौर्या गहिलोत, कार्तिक खरात तर वर्ग दुसरी मधून अर्पित तायडे, कुणाल शेंडे, अर्जुन पैठणकर, कबीर राखोंडे, अदिती शिरसाट, नमन शेंडे, स्वरा डोंगरे, आर्यन राऊत, समीक्षा गिऱ्हे, सार्थक बंड, सौम्या गहिलोत, ओम फाटकर समर्थ पाटील, आयुष सोनोने, रिद्धी उगले, तेजस उगले. वर्ग चौथी मधून पार्थ परमाळे, अनुश्री मुसळे, भार्गवी गणेशे, शरयू बगाडे, गौरव डाखोरे वर्ग पाचवी मधून गौरी इंगळे, अक्षरा शेंडे वर्ग सहावी मधून प्रशिका खंडारे, कृष्णा सरप, सिद्धांत पेंढारकर, गौरव पेंढारकर वर्ग सातवी मधून सय्यद. शाहिद, प्रेरणा कांबळे, मिताली उगले, चक्रधर भगत, अश्विन निमकंडे.वर्ग आठवी मधून तृप्ती खरात, श्रेया तेलंगडे, पार्थ तेलंगडे, सिद्धी पाकदुने आदींसह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी प्राचार्य चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, सुलभा परमाळे, नितु ढोणे, वंदना पोहरे, किरण दांडगे,जयेंद्र बोरकर, शीतल कवडकर, बजरंग भुजबटराव, अश्विनी अंभोरे,अविनाश पाटील, काजल चव्हाण,रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी सहकार्य केले.