आपण कोणत्याही शॉपिंग साइटवर काही सर्च केलं की, त्यानंतर आपल्याला आपल्या सर्चशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती दिसू लागतात. असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मोबाइल फोनद्वारे ट्रॅकिंग (Tracking) केलं जात असल्यानं तुम्ही काय सर्च करत आहात, कोणत्या उत्पादनामध्ये तुम्हाला रस आहे, याची माहिती मिळवली जाते आणि तुमच्यावर सबंधित उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा सुरू होतो. मात्र यातून सुटकेचा मार्गही आहे.
अलीकडेच अॅपलने (Apple) आपल्या युजर्सला कोणत्या कंपनीने त्यांना ट्रॅक करावा किंवा नाही हे स्वतः ठरवण्याची सुविधा दिली होती. आपल्या फोनवर किंवा वेब ब्राउझरवरील (Web Browser) विविध अॅप्स आणि वेबपेजेसद्वारे जाहिरात ट्रॅकिंग रोखण्याचा उपायही आहे.
अँड्रॉइडवर जाहिरात ट्रॅकिंग थांबवण्यासाठी –
– अँड्रॉइड (Android ) सेटिंग्जमध्ये गुगलवर (Google) जा.
– गुगलवर ‘जाहिराती’ (Advertisement) वर टॅप करा आणि ‘जाहिरात आयडी रीसेट’ (Advertisement ID Reset) ऑप्शनवर टॅप करा.
-‘ऑप्ट आउट ऑफ अॅड पर्सनलायझेशन’ वर टॅप करा.
– स्क्रोल करून ‘पर्सनलाइज्ड युजिंग शेअर्ड डाटा’ ऑप्शन निवडा आणि तो बंद करा.
– गुगल मेनूमधून बाहेर पडा आणि सेटिंग्जवरील प्रायव्हसी ऑप्शनवर जा.
– इथे तुमच्या फोननुसार वेगवेगळे पर्याय असतील. त्यातील ‘सेंड डायग्नॉस्टिक डाटा आणि ‘रिसिव्ह मार्केटिंग इन्फर्मेशन’ ऑप्शन सिलेक्ट करून ते बंद करा.
– अँड्रॉइड पर्सनलायझेशन सर्व्हिस (Android Personalization Service) असेल तर तीदेखील बंद करा.
– ‘डिव्हाइस पर्सनलायझेशन सर्व्हिस’वर टॅप करा आणि डेटा क्लिअर करा.
-‘डिव्हाइस आयडी आणि अॅड’ यासारखे पर्यायदेखील पाहू शकता. ते बंद करा आणि डिव्हाइस आयडी रीसेट करा.
या ऑप्शनच्या खाली आपल्याला गुगल सेवांसाठी प्रायव्हसी टॉगल दिसेल. ‘प्लेस हिस्ट्री’ (Place History), ‘अॅक्टिव्हिटी कंट्रोल’, अॅड हे पर्याय निवडा.
– या प्रत्येक पर्यायांतर्गत, प्रत्येक वैशिष्ट्यासाठी गुगल ट्रॅकिंग बंद करा. आधीचा डेटा क्लिअर केल्याची खात्री करा. त्यामुळे आपल्या फोनवर आणि गुगलवर तुमचा सर्च स्टोअर केला जाणार नाही.
ब्राउजरमध्ये गुगल क्रोम (Google Chrome) वापरणं टाळा आणि त्याऐवजी ब्रेव्ह (Brave) आणि मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox) सारख्या ब्राउजरचा वापर करा.
ब्रेव्ह वापरत असल्यास, ब्राउजरवरील सेटिंग्जवर जा आणि ‘ब्रेव्ह शिल्ड अँड प्रायव्हसी’ निवडा. अॅग्रेसिव किंवा स्ट्रिक्ट ब्लॉलिंग ऑफ ट्रॅकर्स आणि ब्लॉक क्रॉस-साइट कुकीज ब्लॉक करा. ही दोन वैशिष्ट्ये सर्व वेबसाइट्सना ट्रॅकिंग करण्यापासून रोखतील. शेवटी गुगलवरून डक डकगोसारख्या (DuckDuckGo) प्रायव्ह्सी स्पेसिफिक सर्च इंजिनवर स्विच करा.
आयओएस (IOS) वर ट्रॅकिंग थांबवण्यासाठी –
– आयओएसवर (IOS), गुगलला (Google) रोखण्यासाठी फोनद्वारे (Smart Phone) संपूर्ण प्रक्रिया करता येणार नाही, म्हणूनच आपल्या पीसीचा वापर करून गुगल अकाऊंटवर लॉगइन करा आणि सेटिंग्ज चालू करण्यासाठी प्रायव्हसी ऑप्शन निवडा.
– नंतर आपल्या आयफोनवरील सेटिंग्ज अॅपवर ‘अॅपल अॅड’ ऑप्शन निवडा.
– या अंतर्गत ‘पर्सनलाइज्ड अॅड’चा पर्याय दिसेल. हे सेटिंग बंद करा.
– इथून बाहेर पडा आणि लोकेशन सर्व्हिस निवडा.
– इथे सर्व अॅप्सची यादी दिसेल. प्रत्येक अॅप निवडा आणि आवश्यक नसल्यास त्याची लोकेशन सर्व्हिस (Location Service) बंद करा. लोकेशन सर्व्हिस सुरू केली तरी हे अॅप्स तुमच्या सर्चपर्यंत येणार नाहीत. त्यानंतर लोकेशन सर्व्हिस पूर्णतः बंद करा.
– तुम्ही आयफोनवर Safari (सफारी) ब्राउजर वापरत असल्यास, त्यातील सेटिंग्जदेखील बदलणं महत्वाचं आहे. यासाठी, सेटिंग्ज मेनूमधून सफारी सेटिंग्जवर जा आणि तिथे ‘प्रायव्हसी आणि सेफ्टी’वर स्क्रोल करा, नंतर ‘क्रॉस-साइट ट्रॅकिंग’ ऑप्शन शोधून तो बंद करा.
– वेबपेजेसवर ट्रॅक केले जात नाही हे निश्चित करण्यासाठी या सेटिंग अंतर्गत ‘कुकीज ब्लॉक’चा ऑप्शन सुरू करा.
– अॅप्स आपल्या डिव्हाइसवरील डेटा सतत ट्रॅक करत नाहीत याची खात्री करण्यासाठी ‘बॅकग्राउंड अॅप रीफ्रेश’ बंद करा. या अंतर्गत, केवळ बॅकग्राउंड रीफ्रेशसाठी आवश्यक आणि विश्वासार्ह वाटत असलेली काही निवडक अॅप्स वगळा. इतरांसाठी ही सर्व्हिस बंद करा.