वणी वारुळा (राजकुमार वानखडे)- अकोट तालुक्यातील वणी वारुळा परीसरात अतिवृष्टी मुळे मोहाडी नदिला आलेल्या पुराने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली असुन या नदिच्या पाण्यामुळे पिके पाण्याखाली आले असुन या नदिच्या पाण्यामुळे पिके सडली आहेत तसेच तांदुळवाडी फाट्यावर असलेल्या नाल्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली असुन शेतकऱ्यांनवर फार मोठे संकट आले आहे.
वणी वारुळा परीसरात अतिवृष्टी मुळे मोहाडी नदिला गेल्या दोन दिवसांपासून पुर आल्याने या परीसरातील वणी, वारुळा, तांदुळवाडी,सोनबर्डी,आलेगाव,खेर्डा, पिप्रि डिक्कर, बळेगांव येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतातुन मोहाडी नदीच्या पात्रातील पाणी शेतात शिरल्या मुळे वणी वारुळा परीसरातील वामनराव वानखडे, भगवंतराव मोहोकार, दिपक पालखडे, रमेश पालखडे, किशोर मोहोकार, ज्ञानेश्वर मोहोकार, दादाराव मोहोकार, भगिरथ पोटे, सोळंके, दिनेश मोहोकार, पंजाबराव पालखडे,बबन पळसपगार,रायबोले,लायसे, प्रविण पोटे, सह असंख्य शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सदर पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली असुन तांदुळवाडी फाट्यावर असलेल्या नाल्यामुळे हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा यासाठी खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.या वेळी तलाठी केळकर ह्यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली आहे.