वाडी अडमपूर(आनंद बोदडे)- तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथील नागझरी नदीला आलेल्या पुरामुळे उकळी वागरगाव रोडवरील पुलावरून पाणी ओसांडून वाहत असून या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या फुलाचे बांधकाम केल्यानंतर 2015 मध्ये अशाच प्रकारे नदीला आलेल्या पुरामुळे या नदीमध्ये वृद्ध महिला वाहून गेली होती यावर्षी या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे पावसाचा जोर आणखी वाढल्यास नदीमधील पाण्याची पातळी आणखी वाढू शकते त्यामुळे परिसरातील व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे