अकोला– गुरु पौर्णिमानिमित्त बुधवार दि. 23 जुलै रोजी खण्डवा येथे श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळावर मोठया संख्येने भक्त येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दि. 21 ते 23 जुलै या कालावाधीत श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद ठेवण्याचे आदेश खण्डवाचे (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी अजय व्दिवेदी यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी गुरु पौर्णिमाचे उत्सव घरी राहून साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे