अकोला(आनंद बोदडे)- संगणकाच्या युगात वाचन संस्कृतीचं जतन करणारे केंद्रे म्हणजे ग्रंथालयेच आहेत,ग्रंथांनिच महापुरुष घडविले हे सिध्द झालेल आहे,परंतु आज शासनाच्या ऊदासिन धोरणांमुळे ग्रंथालयांची अवस्था बिकट होत चालली आहे,महाराष्ट्र राज्यात सद्ध्या शासनमान्य अ.ब.क.ड दर्जाची सुमारे बारा हजार एकशे साठ,तर अकोला जिल्ह्यात चारशे त्र्याहत्तर ग्रंथालये अस्तीत्वात असुन ,शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयांचे सन २०१९-२०चे मार्च २०२१अखेर मिळणारे अनुदान अजुनपर्यंत न मिळाल्यामुळे ग्रंथालयाचे कर्मचारी वेतन,ग्रंथ खरेदी,मासिके,पाक्षीके,साप्ताहीके,ईमारत भाडे व ईतर खर्च करणे अशक्य झाले आहे,म्हणुन मा.माजी आमदार गंगाधरजी पटणे साहेब यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२०-७-२०२१पासुन “आमरण ऊपोषण”करन्याचा निर्धार केला असुन,त्यांना पाठींबा देन्यासाठी नांदेडला जाणे शक्य होत नसले तरी,आम्ही अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.शामरावजी वाहुरवाघ यांचे मार्गदर्नात,तेल्हारा तालुका ग्रंथालय कृती समितीच्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोला जिल्हाधिकारी यांचे मार्फत,मा.संजयजी खडसे साहेब ऊपजिल्हाधिकारी यांना माजी आमदार मा.गंगाधरजी पटणे साहेब यांना पाठींबा देऊन ग्रंथालयाचे थकीत अनुदान त्वरीत देन्यासाठी दि.१९-७-२०२१रोजी निवेदन सादर केले असुन,यावेळी,प्रदिप तेलगोटे,जिवन बोदडे,राजु ईंगळे,विनोद गव्हांदे,पंजाब तायडे,मिलींद दांडगे,प्रमोद ताथोड,बाबुराव वानखडे,सदानंद मोरे,श्यामशिल भोपळे,तेजराव कुकडे,बाळाभाऊ पाथ्रिकर,ईत्यादी तेल्हारा तालुक्यातिल ग्रंथालय कार्यकर्ते ऊपस्थित होते,थकीत अनुदान न मिळाल्यास आम्ही सुद्धा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण करु असा सुद्धा निवेदनाद्बारे ईशारा दिला आहे…!!!