• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, October 14, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापानं (Step Father) अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Team by Team
July 21, 2021
in विदर्भ, Buldhana, गुन्हा
Reading Time: 1 min read
201 2
0
rape
30
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

खामगाव: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापानं (Step Father) अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या (Accused commits suicide) या दुहेरी घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही घटनांचा एकत्रित तपास केला जात आहे.

खरंतर, 55 वर्षीय आरोपीनं यापूर्वीही आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. तेव्हा आरोपी सात दिवस फरार झाला होता. दरम्यान त्यानं पुन्हा एकदा आपल्या मुलीचा विनयभंग केला. यामुळे पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी रविवारी 55 वर्षीय सावत्र बापाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच, आरोपी वडिलांनी जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

हेही वाचा

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ

ही खळबळजनक घटना उघडकीस येताच, मृताच्या नातेवाईकांत आणि तक्रारदार मायलेकीत चांगलाचं वाद उफळला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटवला आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

आरोपीनं यापूर्वीही आपल्या सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. त्यावेळी तो तब्बल सात दिवस घराबाहेर होता. दरम्यान त्यानं पुन्हा आपल्या मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेत आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी रविवारी शोध मोहिम थांबवली होती. पण आरोपीनं मंगळवारी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. आरोपीनं चुकीच्या आरोपांमुळे आत्महत्या केली की पश्चातापातून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Tags: Crime News BuldhanaMolestationविनयभंग
Previous Post

ब्रेकिंग- तेल्हारा पोलीसांना पुन्हा चोरट्यांचा सलाम घरी नसल्याचे बघून अडीच लाखाच्या मुद्देमालावर डल्ला!

Next Post

धक्कादायक! ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्…

RelatedPosts

अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ
Featured

प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ

October 6, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 1, 2025
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे  भव्य रोग निदान  शिबिर संपन्न
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे भव्य रोग निदान शिबिर संपन्न

September 30, 2025
Featured

ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. – वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला

September 25, 2025
Next Post
Murder

धक्कादायक! 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्...

स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.