तेल्हारा( प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल रहीवासी अरुण गोकुलचंद पाडीया यांच्या राहत्या घरी दि.१७ ते १८ जुलै च्या रात्री अज्ञात चोरट्याने घराचा कुलुप कोंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण ३लाख२८हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना १८जुलै रोजी सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी अरुण गोकुलचंद पाडीया वय ५९वर्षे या.राठी ले आऊट तहसिल रोड तेल्हारा हे पत्नी व मुलगा व सुनेसह दि.१७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता चे सुमारास अनसिंग ता.जि. वाशिम ला साळ्याच्या भेटीला घरातील कपाट मुख्य दरवाजा व आवाराच्या लोखंडी फाटकाला कुलपे लावुन गेलेले असताना दि.१७व१८ जुलै च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलुप कोंडा तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील कानातील सोन्याचे १२ ग्राम किंमत ३६ हजार रू. अंगठी ४ग्राम किंमत १२हजार रु नथ २नग८ग्राम किंमत २४हजार रु पेंडाल सेट २नग २०ग्राम किंमत ६०हजार रु नाकातील बेसर १०जोड१०ग्रामकिंमत ३०हजार रु चांदीचे शिक्के १०नग १००ग्राम किंमत ७हजार रु चांदीचे ग्लास ३नग३०ग्राम किंमत दोन हजार रु चांदीचे १० जोड१००ग्राम किंमत ७हजार रु नगदी रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण ३लाख२८हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची बाब १८जुलै रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी फिर्यादीने नोंदविलेल्या तक्रारी वरुन तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये भा द वि च्या कलम ४५७,३८०, कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत