तेल्हारा (प्रतिनिधी)-तेल्हारा तालुक्यातील ईसापुर ग्रामपंचायत सह अनेक गावातील गावठाण मधील घरकुलास पाञ असलेले अतिक्रमन धारकांचा प्रश्न मागील वर्षापासुन प्रलंबीत आहे सदर प्रश्न कोरोनामुळे प्रलंबीत होता हे मी समजु शकते परंतु सध्या तालुक्यातील रुग्ण संख्या खुप कमी असुन कार्यालयीन कामे सुरळीत चालु आहेत तरीही शेकडो नागरीक घरकुलाचा लाभ मीळण्या पासुन वंचीत आहेत .तालुक्यामध्ये गावठाणतील एकुन 128 प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकारी अकोट यांचा आदेश सुध्दा एप्रील महीण्यात झालेला आहे.परंतु या नागरीकांच्या खात्यामध्ये पहीला हप्ता पडलेला नाही.या संदर्भात गटविकास अधिकार यांणा विचारणा केली असता अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडुन मंजुरात येणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपविभगीय अधिकारी यांचा आदेश होवुन सुध्दा एवढा उशीर लागल्यामुळे आनेक नागरीक घरकुला पासुन वंचीत आहेत तसेच ईसापुर येथिल वृध्द विधवा महीला सुशीलाबाई महादेव कचवे हिचे घर अतिशय जिर्ण झालेले असुन ते घर केंव्हा पडेल याचा नेम नाही ती महीला सुध्दा घरकुल येणार आशेने वाट बघत आहे हि बाब खुप गंभीर असुन याकडे समंधीत विभाग यांणी त्वरीत लक्ष देवुन उपाय योजना करावी अन्यथा शासनाकडे दाद मागण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन सरपंच मिराताई आनंद बोदडे यांणी गटविकास अधिकारी यांणा दिले आहे या निवेदनावर उपसरपंच महादेवराव नागे, बाभुळगावचे सरपंच श्रीकृष्ण वैतकार, प्रदिप तेलगोटे, ग्रा.पं सदस्य कमलाबाई घोडस्कार, जयश्रीताई खंडुजी घाटोळ, पंजाबराव तायडे,नितीन पाखरे, पंजाबराव दुसेकर, रतन दांडगे. प्रकाश बोदडे,खंडुजी घाटोळ, शुध्दोधन गवई पञकार दिपक दारोकार सुरेंद्र भोजने आनंद बोदडे यांच्या सह्या आहेत