अमरावती, 12 जुलै : विदर्भाचे (Vidarbha) नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे देशातील पहिला व आशिया खंडातील तिसऱ्या असा नावीन्यपूर्ण असलेल्या स्काय वॉकचे (chikhaldara skywalk) काम सुरू झाले. विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, केंद्राच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने (Union Ministry of Forests and Environment) या स्काय वॉकमध्ये त्रुट्या काढून तुर्तास रद्द केला आहे.
चिखलदरा येथे हरिकेन ते गोराघाट या पॉइंट दरम्यान 407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा स्काय वॉक सिडकोच्या वतीने साकारला जात आहे. सिडकोने चिखलदरा आणि अमरावती येथील वन विभाग, व्याघ्र प्रकल्प विभागाची परवानगी घेऊन या प्रकल्पाला सुरूवात केली.
मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयाने तुर्तास त्रुट्या काढून परवानगी नाकारली असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता डी एस जमनेकर यांनी सांगितले. या वृत्ताला व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
केंद्राच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने या स्कायवॉक संदर्भात तीन त्रुट्या काढलेल्या आहेत. त्यातील एक त्रुटी आधीच पूर्ण केली असली तरी परत काढली आहे. या स्काय वॉकला आमचा विरोध नाही मात्र वन्यजीव व पर्यावरणाचा त्रास होऊ नये अशी भूमिका वन्यजीव संरक्षकानी मांडली आहे.
काढलेला त्रुटी
1- नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्ड लाईफची परवानगी घेणे
2- पर्यावरणावर स्काय वॉकचा काय परिणाम होईल याचे स्पष्टीकरण देणे
3- वन्य प्राण्यांवर या स्कायवॉकचा काय परिणाम होईल याचे स्पष्टीकरण देणे
तीन देशातील स्काय वॉक
स्विझर्लंड स्काय वॉक -397 मिटर
चीनमधील स्काय वॉक -360 मिटर
चिखलदरा येथील स्काय वॉक -407 मिटर