अकोला- भारतीय स्टेट बॅंकेने नवीन सीएमपी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार प्रत्येक आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा सेवार्थ आयडी हा युजर नेम म्हणून वापरावयाचा आहे. त्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचा सेवार्थ आयडी चा अचूक तपशिल भारतीय स्टेट बॅंकेस द्यावयाचा आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यालय व आहरण संवितरण अधिकाऱ्यांबाबतचा तपशिल आपापल्या संबंधित कोषागार वा तालुका कोषागार कार्यालयास बुधवार दि.१४ पर्यंत सादर करावा, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.