धुळे- अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना, आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धीप्रमुख नेमण्याच्या निर्णयानुसार राज्यातील उपाध्यक्ष विभागीय सचिव यांच्या शिफारशीनुसार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख जाहीर केले आहेत.
‘‘माध्यम क्षेत्रात घडणाऱ्या असंख्य सकारात्मक बाबी परिषदेच्या या नव्या उपक्रमांमुळे जगासमोर येणार असून त्यातून पत्रकारांबद्दल समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन कमी होण्यास मदत होईल. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणजे परिषदेचे कान आणि डोळे आहेत.’’ या शब्दात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, राज्याचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, राज्याचे मिडीया सेल प्रमुख बापूसाहेब गोरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
स्थापनेस 82 वर्ष झालेली 35 जिल्हे, 354 तालुके व आठ हजार सदस्य एव्हढे नेटवर्क असलेली अ.भा. मराठी परिषद ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नेमणारी पहिलीच संघटना आहे. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली परिषदेचे कार्य जोरदारपणे सुरु असून आंदोलनाच्या माध्यमातून जाहिरात दरवाढ, पत्रकारांचे पेन्शन, आरोग्यविषयक, अनेक प्रश्न सोडविले असून काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार दरबारी संघर्ष सुरु आहे.
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राज्यातील नवनियुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुढीलप्रमाणे- कोकणातील विभाग- सिधुंदुर्ग, हरिश्चंद्र चंद्रकांत पवार, सावंतवाडी जि,सिधुदुर्ग, रत्नागिरी-जमीर खलपे, प्रतिनिधी- रत्नागिरी एक्स्प्रेस, रायगड- कमलेश ठाकूर, पेण, पुढारी पेण तालुका प्रतिनिधी, पालघर- विजय माणिक घरत (पालघर जिल्हा), संपादक – साप्ताहिक जनतेचा वाली , कोल्हापूर – भाऊसाहेब सकट ,कोल्हापूर , कागल, पुणे विभाग प्रसिध्दी प्रमूख -पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख- भरत अर्जुन निगडे, दैनिक लोकमत, नीरा,सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- दिपक शिंदे, दै. लोकमत सातारा, सांगली जिल्हा- चंद्रकांत गायकवाड, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- अनिरुद्ध बाळासाहेब बडवे, संपादक-दै. पंढरी संचार, पंढरपूर,अमरावती विभाग प्रसिध्दी प्रमुख बुलढाणा, मोहन चौकेकर – बुलडाणा जिल्हा, यवतमाळ- विजय बुंदेला, यवतमाळ जिल्हा (मो.), अमरावती- बबलू दोडके : अमरावती जिल्हा , वाशीम- गजानन वाघ : वाशिम जिल्हा, अकोला-निलेश जवकार : अकोला जिल्हा, अमरावती- अमर राऊत – अमरावती जिल्हा.
नागपूर विभागातील जिल्हानिहाय नावे – नागपूर- सुभाष बाळकृष्ण राऊत- संपादक साप्ताहिक चिरकाल सत्य , मु.बुटीबोरी तालुका +जिल्हा नागपूर, वर्धा- प्रतीक मेधे- संपादक- दैनिक प्रतापगड चे वारे, भंडारा व गोंदिया- यशवंत थोटे, रा. मोवाडी तालुका जिल्हा भंडारा , गडचिरोली- लोमेश बुरांडे, दैनिक लोकमत , रा. तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली,चंद्रपूर- सुजित बोम्मावार, प्रतिनिधी सर्च टीव्ही, पत्रकार दैनिक पुण्यनगरी, रा.तालुका सावली जिल्हा चंद्रपूर.
औरंगाबाद व लातूर विभाग -औरंगाबाद – सुनिल वाघमारे , बीड -प्रचंड सोंळके जालना – नाव- अविनाश कवळे, उस्मानाबाद-हुकमत मुलानी (9623261000), लातूर, नितिन भाले, नांदेड – ॲड. दिंगबर गायकवाड , परभणी- श्रीकांत देशमूख, हिंगोली, प्रकाश ईंगोले ,नाशिक विभागातील प्रसिद्धी प्रमुख- नाशिक – प्रमोद दंडगव्हाळ, दै.सकाळ,नाशिक, धुळे-नंदुरबार गो.पी.लांडगे, साप्ताहिक. एकला चालो रे, जळगाव – डॉ. गोपी सरोदे, दै.देशदूत,जळगाव, अहमदनगर- अमोल वैद्य, दै.सार्वमत,अकोले.