नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मंत्र्यांना डच्चू दिल्यानंतर अनेक मंत्र्यांची महत्वाची खातीही बदलण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्रीपदाचा भार मनसुख मांडवीय यांच्याकडं देण्यात आलं आहे. शिक्षण खातं धमेंद्र प्रधान तर नारायण राणे यांच्याकडं सुक्ष्म, लघु उद्योग मंत्र्यालय देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयही ठेवले आहे. स्मृती इराणींकडील वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी काढून त्यांना पुन्हा महिला व बाल कल्याण मंत्री करण्यात आले आहे. तर वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी पियुष गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडी रेल्वे खातं अश्विनी वैष्णव यांना मिळालं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना हवाई वाहतूक मंत्रीपद देण्यात आले आहे. हरजितसिंह पुरी यांची बढती झाली असून ते पेट्रोलियम व नगर विकास मंत्रीपद सांभाळतील.
मोदी सरकारचे नवे मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री :
1. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
2. अमित शहा – गृह, सहकार मंत्री
3. नितीन गडकरी – रस्ते परिवहन व महामार्ग
4. निर्मला सीतारमण – अर्थ व कंपनी व्यवहार
5. नरेंद्र सिंह तोमर – कृषी व शेतकरी कल्याण
6. डॅा. एस. जयशंकर – परराष्ट्र
7. अर्जून मुंडा – आदिवासी विकास
8. स्मृती इराणी – महिला व बाल विकास
9. पियुष गोयल – वाणिज्य व उद्योग, वस्त्रोद्योग, अन्न व ग्राहक व्यवहार
10. धर्मेंद्र प्रधान – शिक्षण व कौशल्य विकास
11. प्रल्हाद जोशी – संसदीय कार्य, कोळसा व खाण
12. नारायण राणे – सुक्ष्म, लघु व मध्य उद्योग
13. सर्वानंद सोनोवाल – आयुष, बंदरे व जहाज बांधणी
14. मुख्तार अब्बास मंत्री – अल्पसंख्यांक मंत्री
15. विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय
16. गिरीराज सिंह – ग्राम विकास व पंचायत राज
17. ज्योतिरादित्य शिंदे – नागरी हवाई वाहतूक
18. रामचंद्र प्रसात सिंग – पोलाद
19. अश्विनी वैष्णव – रेल्वे, विज्ञान व तंत्रज्ञान
20. पशुपती कुमार पारस – अन्न प्रक्रिया उद्योग
21. गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती
22. किरण रिजिजू – कायदा व न्याय
23. राजकुमार सिंह – उर्जा, अपारंपरिक उर्जा
24. हरदिपसिंह पुरी – पेट्रोलियम व नैसर्गिय वायू, नगर विकास
25. मनसुख मांडविया – आरोग्य व कुटूंब कल्याण, रासायनिक व खते
26. भुपेंद्र यादव – पर्यावरण, वन व हवामान बदल, कामगार व रोजगार
27. महेंद्र नाथ पांड्ये – अवजड उद्योग
28. परषोत्तम रुपाला – मत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध विकास
29. जी. किशन रेड्डी – सांस्कृतिक, पर्यटन
30. अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण, क्रीडा व युवक कल्याण
राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) :
1. राव इंद्रजित सिंह – नियोजन, सांख्यिकी, कंपनी व्यवहार
2. जितेंद्र सिंह – विज्ञान व तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुउर्जा, अवकाश संशोधन
राज्यमंत्री :
1. श्रीपाद नाईक – बंदरे, जहाज बांधणी, पर्यटन
2. फगनसिंह कुलस्ते – पोलाद, ग्राम विकास
3. प्रल्हाद सिंह पटेल – जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग
4. अश्विनी कुमार चौबे – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वने व हवामान बदल
5. अर्जून राम मेघवाल – संसदीय कार्य व सांस्कृतिक
6. व्ही. के. सिंग – रस्ते परिवहन व महामार्ग व हवाई वाहतूक
7. क्रिशन पाल – उर्जा, अवजड उद्योग
8. रावसाहेब दानवे – रेल्वे, कोळसा, खाण
9. रामदास आठवले – सामाजिक न्याय
10. साध्वी निरंजन ज्योती – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राम विकास
11. संजीव कुमार बलयान – मत्स्य, पशुपालन व दुग्धविकास
12. नित्यानंद राय – गृह
13. पंकज चौधरी – अर्थ
14. अनुप्रिया सिंह पटेल – वाणिज्य व उद्योग
15. एस. पी. सिंग बघेल – कायदा व न्याय
16. राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान
17. शोभा करंदलजे – कृषी
18. भानु प्रताप सिंह वर्मा – सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
19. दर्शना जारदोश – वस्त्रोद्योग, रेल्वे
20. व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य
21. मिनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक
22. सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग
23. रेणुका सिंह सरूटा – आदिवासी विकास
24. रामेश्वर तेली – पेट्रोलियम, कामगार व रोजगार
25. कैलास चौधरी – कृषी
26. अन्नपुर्णा देवी – शिक्षण
27. ए. नारायणस्वामी – सामाजिक न्याय
28. कौशल किशोर – नगर विकास
29. अजय भट – संरक्षण व पर्यटन
30. बी. एल. वर्मा – सहकार
31. अजय कुमार – गृह
32. देवुसिंह चौहान – दुरसंचार
33. भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा, रसायन व खते
34. कपिल पाटील – पंचायत राज
35. प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय
36. सुभाष सरकार – शिक्षण
37. भागवत कराड – अर्थ
38. राजकुमार रंजन सिंग – परराष्ट्र, शिक्षण
39. भारती पवार – आरोग्य व कुटूंब कल्याण
40. बिश्वेश्वर तुडू – आदिवासी, जलशक्ती
41. शंतनू ठाकूर – बदरे, जहाज बांधणी, जलवाहतूक
42. मुंजापरा महेंद्रभाई – महिला व बाल विकास, आयुष
43. जॅान बारला – अल्पसंख्यांक
44. एल. मुरूगन – मत्स्य, पशु संवर्धन व दुग्ध विकास, माहिती व प्रसारण
45. निसिथ परमाणिक – गृह, युवक कल्याण व क्रीडा