मोबाईलचा वापर हल्ली अनेक कामांसाठी केला जातो, परंतु याचे मुख्य काम कॉल्स करणे हे आहे. कोरोनामुळे घरातून काम करताना महत्वाच्या कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. अश्यावेळी येणाऱ्या टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्सचा त्रास तर होतोच. असे कॉल्स बऱ्याचदा महत्वाच्या कामाच्या वेळीच येतात. आपण आपल्या कामाचा कॉल असेल म्हणून तो उचलतो परंतु तो स्पॅम कॉल निघतो.
मग मनात विचार येतो कि अशी एखादी सेटिंग असेल का जी हे कॉल्स बंद करेल. अश्याच एका सर्व्हिसबाबत आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कोणतीही ट्रिक नसून सर्विस आहे जिचे नाव डू नॉट डिस्टर्ब (DND) आहे. या लेखात आपण Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर ही सर्विस कशी अॅक्टिव्हेट करू शकतो, हे पहाणार आहोत.
रिलायन्स जियो नंबरवर असे करा DND अॅक्टिव्हेट
सर्वप्रथम फोनमध्ये My Jio अॅप इंस्टॉल करा.
त्यानंतर अॅपमध्ये लॉगइन करा.
आता डावीकडे असलेल्या मेनू बटनवर टॅप करून सेटिंग्स पर्यायात जा.
तिथे Do not disturb सिलेक्ट करा आणि तुमचा प्रिफरन्स निवडा.
त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून मेसेज येईल कि, सात दिवसात तुमच्या नंबरवर DND सर्विस अॅक्टिव्हेट होईल.
एयरटेल नंबरवर असे करा DND अॅक्टिव्हेट
सर्वप्रथम Airtel च्या वेबसाइटवर जा आणि त्यानंतर ‘एयरटेल मोबाईल सर्विस’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर स्क्रीनवर आलेल्या पॉप-अप बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका.
आता तुम्हाला फोनवर एक ओटीपी येईल, तो सबमिट करा.
त्यानंतर Stop All Options वर टॅप करा.
तुमच्या नंबरवर DND सर्विस अॅक्टिव्हेट होईल.
वोडाफोन-आयडिया नंबरवर असे करा DND अॅक्टिव्हेट
सर्वप्रथम Vi च्या वेबसाइटवरील DND पेजवर जा.
इथे नाव, ईमेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर फुल DND ऑप्शनसाठी yes वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल.
हा ओटीपी सबमिट करा.
आता तुमच्या नंबरवर डीएनडी सर्विस अॅक्टिव्हेट होईल.
BSNL किंवा MTNL नंबरवर असे करा DND अॅक्टिव्हेट
BSNL आणि MTNL नंबरवरून ‘START 0’ लिहून 1909 वर मेसेज पाठवा. मेसेज पाठवल्यानंतर डू नॉट डिस्टर्ब सर्विस अॅक्टिव्हेट होईल.
मेसेजच्या ऐवजी तुम्ही 1909 वर कॉल करून देखील ही सर्विस अॅक्टिव्हेट करू शकता.
इतर कंपन्यांचे ग्राहक देखील 1909 वर कॉल आणि मेसेज करून डू नॉट डिस्टर्ब अॅक्टिव्हेट करू शकतात.