• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

हृदयद्रावक! महिलेनं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन, PM मोदींना लिहिलं अखेरचं पत्र

एका विवाहित महिलेनं देशी बंदुकीतून स्वतःच्या छातीत गोळी मारत आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं एक नोट लिहिली आहे.

Team by Team
July 3, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
227 3
0
suicide
34
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

आग्रा : एका विवाहित महिलेनं देशी बंदुकीतून स्वतःच्या छातीत गोळी मारत आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने भारताचे पंतप्रधान मोदी (PM Narendra modi) यांच्या नावानं एक नोट (Note) लिहिली आहे. ज्यामध्ये तिनं PM मोदींना घरगुती हिंचाचाराबाबत भावनिक साद घातली आहे. सासरच्या घरात महिला कशा सुरक्षित राहतील, याबाबत ठोस पावलं उचलावित, अशा आशयाचं पत्र लिहून विवाहितेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

मोना द्विवेदी असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून तिला दोन लहानं मुलं देखील आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील विद्यापुराम कॉलनीत राहणाऱ्या मोना यांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरात देशी बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली आहे. गोळी झाडल्याचा आवाज येताचं घरातील अन्य एक महिलेनं मोना यांच्या रुमकडे धाव घेतली. घरातील अन्य सदस्यांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा मोना रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

जखमी मोना द्विवेदी यांना घरातील सदस्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मोना यांना मृत घोषित केलं आहे. मृत मोना यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तीन पानांचं पत्र लिहिलं आहे, हे पत्र तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइल फोनवर पाठवून आत्महत्या केली आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून मृत मोना यांनी या पत्राच्या माध्यमातून घरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष्य वेधलं आहे.

आपल्या दीरांनी दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या केली असल्याचं तिनं आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. अंबुज आणि पकंज अशी संबंधित आरोपी दीरांची नावं असून ते स्थानिक सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचा काहीसा दबाव आहे. मोना यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पुढं म्हटलं की, ‘आपण एका गरीब कुटुंबातील असल्यानं संबंधित दोन्ही दीरांनी मला अनेकदा मारहाण केली आहे. मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं. तर माझ्या वडिलांना दारुचं व्यसन आहे. त्यामुळे कुटुंबाचा कोणताही आधार नसल्यानं मी मागील कित्येक वर्षांपासून सासरच्या मंडळींचा त्रास सहन करत आहे. मागील काही वर्षांत त्यांनी मला अनेकदा मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे.’

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. दीर आणि भावजय यांच्यात घरगुती कारणातून भांडणं होत असल्याची माहिती समोर आली, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Tags: suicide news
Previous Post

लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, केंद्र सरकारची माहिती

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
vaccination

कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, केंद्र सरकारची माहिती

स्व.विजय मोहोड यांच्या परीवाराचे शिवसेना संपर्क प्रमुख शिरवाडकर कडून सात्वन

स्व.विजय मोहोड यांच्या परीवाराचे शिवसेना संपर्क प्रमुख शिरवाडकर कडून सात्वन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.