अकोला: राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यामध्ये लेवल-तीन मधील तरतूदीनुसार निर्बंध लावण्यात आले होते. हे आदेश कायम ठेवून जिल्ह्यातील केंद्रीय स्मारके, स्थळे, संग्रहालय व व्याघ्र प्रकल्प पर्यटन केंद्र अटी शर्तीसह खुले ठेवण्यास मुभा देण्यात आली असून शनिवार दि. 3 जुलैचे सकाळी सात वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत.
पुढील बाबीना मुभा :
1. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता दि. 25 जून रोजीचे निर्गमित केलेले आदेश पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
2. जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळे व संग्रहालये ही कोविड-19 चे अनुषंगाने निर्गमित केलेल्या मानक प्रणालीचे अनुषंगाने विहीत अटी व शर्तीनुसार अभ्यागतांकरिता उघडण्यात येत आहेत.
3. अकोला जिल्ह्याच्या परिक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या संरक्षित क्षेत्रात खालील अटी व
शर्तीचे अधिन राहून पर्यटन सुरु करण्यात आले आहे.
अ. बंदीस्त प्राण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रतिबंध असेल.
आ. वाहनांमूळे बफर क्षेत्रातील रस्ते खराब होणार नाहीत व संरंक्षणावर विपरीत परिणाम होणार नाही याची
खबरदारी घ्यावी.
इ. पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींची थर्मल स्कॅनिंग (Thermal Scanning) करणे आवश्यक राहील.
ई. पर्यटनासाठी येणाऱ्या व्याक्तीला प्रवेश देते वेळी foot operated sanitizer dispenser/contactless
hand sanitizer machine वापरून Sanitization करण्यात यावे.
उ. पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना मास्क लावणे आवश्यक राहील.
ऊ. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपहारगृह, होम स्टे व व्याघ्र
प्रकल्पाद्वारे घेण्यात येणारे इतर उपक्रम कोविडच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक
उपाययोजनेचा अवलंब करुन सुरु करण्यात येत आहेत.
4. कृषी सेवा केन्द्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती, औजारे आणि शेतातील
उत्पादनांशी संबंधित दुकाने ही सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरु राहतील.
5. पेट्रोलपंप, डीझेल, सीएनजी गॅस पंप सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत
सर्वसामान्यासाठी तर दुपारी चार ते रात्री आठ अत्यावश्यक सेवेकरिता शहनिशा करुन एमआयडीसी व
राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल व डिझेल पंप नियमीतपणे सुरु राहतील.
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी पाच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच पर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करण्यास मनाई राहील. आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठाने ई ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीचे पालन करावे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश कायम आहे. त्याचे अधिकार संबंधित अनुज्ञप्ती प्राधिकारी, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था , पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग यांचे राहतील.
हे आदेश शनिवार दिनांक 3 जुलै 2021 चे सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.