अकोला– कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत शेतकऱ्यांचा शेतमालाची विक्री व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबी विचारात घेवून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँक व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि. 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योनेचा लाभ मिळण्यास पात्र राहतील. वाढीव मुदतवाढीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.











