तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील चारही भागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने विशाल नांदोकार या युवकाने कामे सुरु करण्याबाबत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या तालुक्यातील रस्त्यांची कामे विनाविलंब सुरु करण्या बाबत आज 30 जून ला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालय तेल्हाऱ्या ला घेराव घालून बेशरम च्या झाडाचे तोरण बांधले असता असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून अटक केली.
तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावी याकरिता विशाल नांदोकार गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे, त्यांच्या समर्थनार्थ तालुका व शहरातील नागरिकांनी साप्ताहिक आंदोलन करण्याचे ठरविले, त्यानुसार काल शहर बंद झाल्यानंतर आज उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा या कार्यालयाला नागरिकांनी बेशरम च्या झाडांचे तोरण बांधल्या नंतर कार्यालयाला घेराव घातल्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली, असता ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गजानन गायकवाड रामभाऊ फाटकर, प्राध्यापक सचिन थाटे, उज्वल दबडघाव, कैलास शिंदे, राजेश वानखडे, स्वप्नील सुरे, नीलेश जवकार, राम वाकोडे, दीपक अंजनकर, रविंद्र वीरघट, पवन खुमकर, आदीं आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.