मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) ५ हजार क्लार्क पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी SBI ने ज्युनियर असोसिएटच्या ५ हजार जागांसाठी होणाऱ्या परिक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. ज्यानी या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज केले त्यांनाच हे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्यावा लागेल.
https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/clpeta_may21/login.php?appid=446c439024467117c52ef46db9717009 या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर समोर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय तुमच्या स्क्रिनच्या डाव्या बाजूला असेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि केप्चा कोड भरावा लागेल. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करताना जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिला गेला आहे हाच पासवर्ड याठिकाणी भरावा लागेल. ही सर्व माहिती अचुक भरल्यानंतर ओके बटणावर क्लिक करा. तुमच्या समोर प्रवेशपत्र स्क्रिनवर दिसेल. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्याची प्रत आपल्याकडे ठेवा.
कोरोनामुळे परिक्षांची नवी नियमावली दिल्याने प्रवेशपत्रावर ज्या काही अटी शर्ती दिल्या आहेत ते वाचने आवश्यक आहे. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षार्थ्याने याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच तुम्हाला परीक्षा केंद्रावर काही वेळ आधीच पोहोचावे लागणार आहे. अधिक माहिती https://sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.